‘महावितरण’ देईल ३ दिवसांत वीज कनेक्शन , 7/12 उतारा जोडून ‘इथे’ करा अर्ज.

महावितरण’च्या ॲपवर जाऊन ए-वन फॉर्म भरावा. फॉर्म भरताना शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा उतारा आणि माहिती त्यामध्ये अपलोड करावी . मात्र त्यावर विहीर व बोअरची नोंद असणे गरजेचे आहे . कनेक्शन घेण्यासाठी ३०००/- ते ४०००/- इतका खर्च व सेक्युरिटी डिपॉझिटसाठी प्रत्येक ‘एचपी’ला १ हजार रुपये भरल्यास ३ दिवसांत विद्युत जोडणी दिली जाते. परंतु वीजेचा खांब व कनेक्शनचे अंतर हे ३० मीटर आवश्यक आहे.

महावितरण’ने २१ हजार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन देण्याचे नियोजन केले आहे. परंतु जून २०२१ नंतर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आणखीन कनेक्शन मिळालेले नाही. डीपीमधील व कनेक्शन यांचे अंतर २०० ते ६०० मीटरपर्यंत आहे.त्या शेतकऱ्यांना कनेक्शन भेटण्यासाठी तेथे डीपी (ट्रान्स्फॉर्मर) बसवावा लागणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर जून २०२१ ला अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कनेक्शन दिले जाईल . वेळेत कनेक्शन देणे, वीज चोरी रोखण्यासाठीचा हा पर्याय रास्त मानला जातो. शेतकऱ्यांना वीज कनेक्शनसाठी संबंधित कार्यालयात स्वतः ता जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज भरून देऊ शकता .

शेतकऱ्यांना ‘सोलर’चा फायद्याचा पर्याय

सोलर पंप जवळपास ३ ‘एचपी’ चा घेतला तर साडेतेरा हजार रुपये , तर ५ ‘एचपी’चा घेतला तर २७ ते २८ हजार रुपयांत बसवून मिळतो. त्यासाठी फक्त १०% इतकी रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागेल . बाकी ९०% अनुदान महावितरनाकडुन शेतकऱ्यांना मिळते. त्या पॅनलचा मेन्टेनंस चा खर्च पाच वर्षे कंपनीच देते व पाच वर्षांसाठी विमा देखील काढून देते . सर्व शेतकरी सोलर पॅनलसाठी अर्ज करू शकतात. ३० टक्के फिडर डिसेंबर २०२५पर्यंत सोलारवर केले जाणार आहे. त्या हेतूने जागांची निवड करण्यात आली आहे.

३० मीटरपर्यंतची वीज जोडणी तात्काळ

कनेक्शनचे अंतर हे ३० मीटरपर्यंत असल्यास वीज जोडणी तात्काळ मिळते. शेतकरी कृषिपंपाच्या कनेक्शनसाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतात . जर दोनशे ते सहाशे मीटर अंतर असेल तर थोडा वेळ लागतो . पण, सर्वांनाच टप्प्याटप्प्याने कनेक्शन मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *