
सध्या नाशिकमध्ये ‘सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर भाव’ खात असून 75 रुपयाच्या दराने विकली जात आहे. शहरामधील भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
प्रत्येकाच्या घरात कोथिंबीर ही वापरलीच जाते. पण आता याच कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला आहे . थेट 75 रुपयांना कोथिंबीर जुडी विकली जात आहे. शेतीतील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने शेतीमालावर परिणाम होत आहे.50% शेतमालाची आवक नाशिक बाजार समिती झाली आहे. शेतमालाची आवक घटल्यामुळे बाजार भाव तेजीत आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीरीच्या जुडीने उच्चांक गाठला आहे.
आवक घटल्यामुळे बाजार दर तेजीत
सध्या कोथिंबिरीची आवक कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये चांगला दर मिळत आहे. बाजारामध्ये 75 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विकली जात आहे . त्यामुळे सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. दमटपणासह उकाड्यात आठ दिवसांपासून वाढ होत आहे. नाशिकसह मालेगाव,जळगाव, धुळे, या उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अॅलर्ट’दिला आहे. राज्यातील अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे आता सध्या शेतमालाची आवक देखील कमी झाली आहे. नियमित होत असलेल्या आवकेच्या तुलनेमध्ये अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.
मेथी व कांदा पात 50 रुपये..
शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो. त्यानंतर विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करून किरकोळ बाजारात भाजीपाला विकला जातो . सध्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक नियमित आवकेच्या तुलनेत होत आहे . त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 25 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन आता 120 ते 150 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. कोथिंबीरसह इतर पालेभाज्या महागल्या आहेत. मेथी ला आणि कांदापातला 50 रुपये जुडी एवढा भाव मिळत आहे.