तुरीचे उत्पादन वाढिसाठी सोपा उपाय तुरीच्या उत्पादनात होईल जबरदस्त वाढ…

भारतातील एक महत्त्वाचे कडधान्य म्हणून तूर पीक हे ओळखले जाते . परंतु खूपदा उत्पादनामध्ये घट येण्याच्या अनेक समस्या येत असतात . लेखामध्ये काही महत्त्वाच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना दिल्या आहेत:

तूर पिकाच्या ओळींमध्ये खांडण्या:

मजुरांद्वारे दोन झाडांतील अंतरानुसार खांडण्या भरणे गरजेचे आहे.

काही ठिकाणी डोबणी २-३ वेळा करून खांडण्या बुजवणे आवश्यक आहे.

निंदणी:

ट्रॅक्टर किंवा बैलजोडीने पेरणी केलेल्या तूर पिकाची निंदणी वेळेवर करणे गरजेचे आहे.

सोयाबीनसोबत आंतरपीक असल्यास सोडओळ (पट्टापेर) पद्धत अवलंबणे आवश्यक आहे.

शेंडे छाटणे:

अलीकडे शेंडे छाटण्याची सुरक्षित अशी छोटी यंत्रे उपलब्ध आहेत.
तूर पीक २५ ते ३० दिवसांचे असताना शेंडे छाटून घ्यावेत.
बुरशीनाशकाची फवारणी छाटणी केल्यानंतर करणे आवश्यक आहे.

पाणी व्यवस्थापन:

शेवरा अवस्थेपूर्वी आणि शेंगांमध्ये दाणे भरताना जमीन ओलीत करणे आवश्यक आहे.

जमिनीत थोडीशी ओल असल्यासच शेंडे छाटणे आवश्यक आहे.

रोग आणि किडींचे नियंत्रण:

फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीला ,शेवरा अवस्थेच्या सुरुवातीला,आणि शेंगांमध्ये दाणे भरताना योग्य कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे.

इतर महत्वाच्या गोष्टी:

जोडओळ पद्धतीचा अवलंब हा सलग तूर लागवडीसाठी करणे आवश्यक आहे.

योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये खते आणि सूक्ष्मजीवके देणे आवश्यक आहे.

तूर व बीटी कपाशी यांच्यातील आंतरपीक पद्धतीत दोन्ही पिकांची जोडओळ पद्धतीने पेरणी करणे आवश्यक आहे.

योग्य वेळी आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून काढणी करणे आवश्यक आहे.

या टिपांचा अवलंब केल्यामुळे तुम्हाला तुमच्या तूर पिकाचे उत्पादन निश्चितपणे वाढण्यासाठी मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *