
kanda bajar bhav : आज दिनांक २७ जून रोजी सकाळच्या सत्रात इस्लामपूर बाजारात कांद्याला १४५०, तर पिंपरी बाजारात १२५० रुपये सरासरी दर मिळाला. दरम्यान दिनांक २६ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १३७० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मागील म्हणजे २५ जूनच्या तुलनेत हा दर सुमारे २० रुपयांनी वाढलेला आहे. मागच्या दिवशी सरासरी दर १३५० रुपये इतका होता. कांद्याच्या दरात ही किंचित सुधारणा आवक वाढूनही दिसून आली आहे.
राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला दोन हजारांहून अधिक दर मिळाला, तर काही बाजारांमध्ये तो एक हजार रुपयांखाली होता. दिंडोरी-वणी या बाजारात सर्वाधिक २६११ रुपये प्रति क्विंटलचा दर नोंदवला गेला, तर राहुरी-वांबोरी येथे कांद्याला केवळ १०० रुपये दर मिळाल्याचे आढळले. ही दरातील तफावत स्थानिक मागणी, दर्जा आणि साठवणुकीच्या स्थितीवर अवलंबून होती.
राज्यातील प्रमुख कांदा बाजारांमध्ये पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सोलापूर व पुणे हे बाजार महत्त्वाचे ठरले. पिंपळगाव बसवंतमध्ये २६ जून रोजी कांद्याचा कमाल दर २२१२ रुपये, किमान दर ४५० रुपये आणि सरासरी दर १५५० रुपये नोंदवला गेला. मागील दिवशी या बाजारात सरासरी दर हाच होता, म्हणजेच दर स्थिर राहिला.
लासलगाव बाजार समितीत कमीत कमी दर ७०० रुपये, जास्तीत जास्त २२५० रुपये आणि सरासरी दर १६५१ रुपये इतका होता. मागील दिवशी सरासरी दर १६०० रुपये इतका होता. यावरून लासलगाव बाजारात दरात थोडीशी म्हणजे सुमारे ५० रुपयांची वाढ झाली आहे.
सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये, जास्तीत जास्त २२५० रुपये आणि सरासरी दर १०५० रुपये इतका मिळाला. मागील दिवशी सरासरी दर फक्त १००० रुपये होता. यावरून सोलापुरातही दरात थोडी सुधारणा झाली आहे.
पुणे बाजारात कांद्याचे कमीत कमी दर ६०० रुपये, जास्तीत जास्त २००० रुपये आणि सरासरी दर १३०० रुपये नोंदला गेला. मागच्या दिवशी येथे सरासरी दर १२५० रुपये होता. त्यामुळे पुणे बाजारातही ५० रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यात सध्या कांद्याची सरासरी किंमत दररोज चढ-उतार करत असून काही बाजारांमध्ये दरात थोडी वाढ दिसून येत आहे. मात्र अजूनही अनेक बाजारात दर १५०० रुपयांच्या खालीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमधील स्थानिक परिस्थिती पाहूनच कांद्याची विक्री करावी, असा सल्ला मिळत आहे.11:42 AM