हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार ,जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी , कसा कराल अर्ज?

हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी , कसा कराल अर्ज

राज्यामध्ये  एकात्मिक फळ  उत्पादन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ,मनरेगा अशा विविध योजनेच्या अंतर्गत नवीन फळबागांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जात असते.  परंतु राज्यामध्ये जर आपण पाहिले तर लागवड केलेल्या किंवा योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या बऱ्याच साऱ्या जुन्या फळबाग आहेत,

ज्या फळबागांची अवस्था आता खूप बिकट अशी आहे तर अशा फळबागांना अनुदान मिळाले तर त्या फळबागाचे पुनर्जीवन झाले तर राज्यामध्ये फळ उत्पादनाचे क्षेत्र वाढू शकते.  त्यामुळे जुन्या फळबागांचे पुनर्जीवनासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे.  परंतु या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे किंवा शेतकरी या योजनेकडे वळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज याच्याबद्दल येत नाहीत.  त्यामुळे कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे. 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023 24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे राज्य मध्ये बरेचसे जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे नांग्या न भरणे खते व औषधांचा योग्य वापर न करणे झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.

नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढवणे ही राज्याची फळ पिकाची एकूण उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे सन 2023 24 मध्ये राज्यांमध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढवणे या दृष्टिकोनातून सदरचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत आंबा संत्रा मोसंबी चिकू या फळ पिकांचा समावेश आहे या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनर्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम एकूण 40000 प्रती हेक्टर ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रुपये 20000 प्रती हेक्टर याप्रमाणे अनुदान देय आहे यामध्ये कमीत कमी 0.20 हेक्टर व कमाल दोन हेक्टर क्षेत्राचे अनुदान देय राहील.

पुनर्जीवन कार्यक्रमासाठी फळ पिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे राहील.

तरी सर्व शेतकऱ्यांना वन करण्यात येते की जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करण्यासाठी आंबा चिकू संत्रा मोसंबी या फळ पिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.  योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *