![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/तुमची-‘कुणबी-म्हणून-नोंद-आहे.webp)
ग्रामपंचायत ,शिक्षण, महसूल ,पोलीस अशा सर्व शासकीय विभागाकडील 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दीड कोटी दस्तऐवज हे सोलापूर जिल्ह्यामध्ये तपासून झाले आहेत. त्यामध्ये 22 हजारांवर नोंदी आढळल्या आहेत. वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने कागदपत्रांसह तहसीलदारांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधितांना 45 दिवसात जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
राज्यामध्ये सर्वाधिक कुणबीच्या नोंदी नगर पुणे धुळे जळगाव सोलापूर कोल्हापूर जालना या जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 22 हजार मध्ये आठवून आले आहेत तसेच नऊ नोव्हेंबर पासून शाळांमधील नोंदी तपासल्या जात आहेत.
आठ लाख दाखल्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये 164 नोंदी कुणबीच्या आढळले असून अध्याप तपासणी सुरूच आहे 3 डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यातील नोंदणीचा अहवाल राज्य सरकारला पाठवल्या जाणार आहे म्हणून जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ दिला असून याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील शिक्षक मुख्याध्यापकांसह भौतिक शासकीय विभागामधील राज्यात 45 हजारांवर कर्मचारी नोंदी तपासत असल्याची स्थिती आहे.
यामध्ये १९४७ ते १९६७ आणि १९४८ पूर्वीच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे याच दरम्यान वंशावळ जुळून उर्वरित कागदपत्रे असल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जात नाही.परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेला ना एका महिन्यातच प्रमाणपत्र दिले जात आहेत.
अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीत .
◼️ वंशावळ (आजोबा,वडिल,, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार.
◼️ अर्जदाराचा रहिवासी दाखला.
◼️ शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड.
◼️अर्जदाराचे रेशनकार्ड,आधारकार्ड
◼️ जन्म- मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा.
◼️ कुटुंबातील व्यक्तीचे जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)
अर्ज कोठे करावा, दाखला किती दिवसात मिळतो..
◼️ सेतू बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे अर्ज करावा.
◼️ अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक.
◼️ अर्ज करताना जात प्रमाणपत्रासाठी ५३ रुपयांचे शासकीय शुल्क द्यावे लागेल
◼️ अर्जातील त्रुटींची माहिती मोबाईलवर अर्जदाराला समजणार.
कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज केलेल्यांना जात प्रमाणपत्र
कुणबी नोंद आढळलेली जात प्रमाणपत्र साठी परिपूर्ण प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केल्यानंतर त्यांना काही दिवसातच प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे पंढरपूर बार्शी अशा तालुक्यांमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहेत.