
इतर पिकांप्रमाणे बांबू शेतीला चालना मिळायला पाहिजे त्यासाठी , अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना या अगोदर 120 रुपये अनुदान तीन वर्षांसाठी प्रतिरोपे विभागून दिले जात होते त्यामध्ये वाढ करून आता एका रोपट्यामागे तीन वर्षे विभागून175 रुपये मिळणार आहेत.आता शेतकऱ्यांना शेतात ‘हिरवे सोने’ पिकवण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
या योजनेअंतर्गत यापूर्वी ६०० टिश्यू कल्चर रोपे १ हेक्टर क्षेत्राकरिता सवलतीच्या दरात दिले जात होते. परंतु , यापूर्वीच्या शासन निर्णयात रोपांच्या देखभालीकरिता तरतूद करण्यात आली नव्हती , आता महसूल व वन विभागाने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला . शेतकऱ्यांना १२०० रोपटी दोन हेक्टरसाठी लागवड व १७५ रुपये देखभालीच्या खर्चासाठी प्रतिरोपटे तीन वर्ष विभागून मिळणार आहेत.
अटल बांबू समृद्धी योजना काय आहे ?
या योजने अंतर्गत एका रोपासाठी ३५० रुपये तीन वर्षासाठी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम अनुदानस्वरूपात शेतकऱ्यांना तीन वर्षात दिली जाणार आहे . शेतकऱ्यांना वन विभागा कडून जर शेतकचाना रोपट्यांचा पुरवठा केला गेल्यास त्या रोपांची किमत अनुदानाच्या पहिल्या वर्षातील हपत्त्यामधून वजा केली जाईल . पैसे खर्च करण्याची शेतकयांना गरज राहणार नाही.
रोपट्यांच्या संगोपनासाठी अनुदान..
राष्ट्रीय बांबू अभियान योजनेच्या समरूप असलेल्या अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत सवलतीत बांबू रोपे शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्यासोबतच खत, पाणी देणे,निदणी, संरक्षण या कामासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. मागील काही वर्षांमध्ये रोजंदारी मजुरांचे दर वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिरोपटे १७५ रुपये दिले जातील. हे अनुदान तीन वर्षासाठी राहणार आहे. , ९० रुपये पहिल्या वर्षी , ५० रुपये दुसऱ्या वर्षी ,३५ रुपये तिसऱ्या वर्षी प्रतिरोपटे अनुदान दिले जाणार आहे.
या अनुदानाचा लाभ कोणाला घेता येणार ?
शेतकरी उत्पादक संस्था, बांबू शेतकयांचा समूह ,कंपनी, यामधील सभासदांनी एकत्रितपणे अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांचा त्यानंतरच विचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात सवलतीच्या दरात बांबू घेऊन बांबू लागवड करता येणार आहे ,शेतकयांना यासाठी अनुदान मिळेल. जर खासगी रोपवाटिकेतून रोपे घेतल्यास त्याचे बिल शेतकऱ्याना जमा करावे लागेल. जास्तीत जास्त शेतकयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र बाबू विकास मंडळ वनवृत्त समन्वयक नितीन कावडकर म्हणाले .
टिश्यू कल्चर बांबू रोपाकरिता ८ प्रजाती..
मानवेल, कटांग या विदर्भात आढळून येणारी प्रजाती आहे . तर मानगा ही स्थानिक प्रजाती कोकण विभागात आढळून येते . याशिवाय अॅस्पर, नूतन,बालकुआ, डॅड्रोकॉल्मस ब्रांडीस्ली, तुलडा आदी पाच प्रजाती निवडण्यात आलेल्या आहेत, अन्य प्रजातीची निवड प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या समितीच्या शिफारशीनुसार करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp या लिंकवर क्लिक करा..