
राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल होत आहे. कधी ढगाळ वातवरण आहे तर कधी थंडीचा कडाका जाणवत आहे, काही भागामध्ये हलक्या सरी होत आहेत. दरम्यान, खान्देश,सांगली , नाशिक, सातारा, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 10 जिल्ह्यामध्ये 28 फेब्रुवारी ते 1 मार्च (बुधवार-शुक्रवार) या तीन दिवसामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती जेष्ठे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली . उत्तर महाराष्ट्रातील धुळे,जळगांव ,नंदुरबार,अहमदनगर नाशिक, या 5 जिल्ह्यामध्ये त्या जवळील भागात आजपासून 1 मार्चपर्यंत या तीन दिवसांमध्ये गारपीटीचीही शक्यताही असल्याचे खुळे यांनी सांगितले .
मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता..
आज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधी मध्ये मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली .मराठवाडयात 2 दिवस म्हणजेच 28 आणि 29 फेब्रुवारीला गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 1 आणि 2 मार्च असे 2 दिवस विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह, विजांच्या कडकडासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले . आज व उद्या बुधवार आणि गुरुवार 28 – 29 फेब्रुवारी मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सह तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे.
अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण, राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष करून कापणीसाठी आलेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे.पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला होता, परंतु नुकसान टाळता आलेले नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी या पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहणं आवश्यक आहे.