देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून प्रसारित,जाणून घ्या वाणांची वैशिट्ये ..

भारत सरकारने केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रामध्ये केला आहे. याबाबत अधिसुचना दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने प्रसिध्‍द केली आहे . विद्यापीठ विकसित सदर पाच वाणामध्ये देशी कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे.

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश देशाच्‍या राजपत्रात केल्‍यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्‍यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधता येईल असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिक वाणांचा देशाच्‍या राजपत्रामध्ये समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार आहे अशी माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग यांनी दिली.

१) देशी कपासीचा पीए ८३३ वाण..

🔰विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पामार्फत हा वाण विकसित केला आहे .
🔰रुईचा उतारा ३५ ते ३६ टक्के आहे, १५ ते १६ क्विंटल प्रति हेक्टर या वाणाची उत्पादकता आहे.
🔰२८ ते २९ मिलिमीटर धाग्याची लांबी आहे.
🔰या वाणांचा १५० ते १६० दिवस कालावधी लागतो.
🔰सरळ धाग्याची लांबी व मजबुती. हा या वाणाचा विशेष गुणधर्म आहे .
🔰कडा करपा, रस शोषक किडी, व दहिया रोगास सहनशील आहे.
🔰तसेच पाण्याच्या ताणास देखील सहनशील.

२) अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ वाण….

🔰हा अमेरिकन कापसाचा वाण असून १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादकता या वाणाची असून रुईचा उतार ३७ ते ३८ टक्के आहे.
🔰२५ ते २६ मिलिमीटर धाग्याची लांबी आहे .
🔰१५५ ते १६० दिवस वाणाचा कालावधी आहे .
🔰रस शोषक किडीस व पाण्याच्या ताणास व सहनशील आहे.
🔰सधन पद्धतीने लागवडीस योग्य असा वाण आहे.

Leave a Reply