![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/‘ग्रेपनेटवर-निर्यातक्षम-द्राक्ष-बागा-नोंदणीसाठी-३१-डिसेंबरपर्यंत-मुदत.webp)
द्राक्षनिर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी,ॲगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण कीड व रोगमुक्त हमी, या सर्व बाबींचे अपेडाच्या सहकार्याने ‘ग्रेपनेट’ प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्यात येते.
राज्यात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून 2023 24 वर्षासाठी शेतकऱ्यांनी निर्यात क्षम द्राक्ष बागेची ऑनलाईन नोंदणी ही 31 डिसेंबर पर्यंत करावी असे आव्हान विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केली.
युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीड व रोगमुक्त उर्वरित अंश हमी देण्यासाठी 2004 पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणाली द्वारे नोंदणी करण्यात येते 2022 23 मध्ये 31 हजार 811 निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात आली.
निर्यातीसोबतच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी 2023 24 साठी जिल्ह्याला 44 हजार 600 द्राक्ष बागांची नोंदणीचे लक्षण देण्यात आले आहे.
या वर्षामध्ये जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे . युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करताना अपेडा’च्या ग्रेपनेट प्रणालीत द्राक्ष बागांची नोंदणी आवश्यक असते.
मात्र चालू हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपीट अशा अडचणींमुळे द्राक्ष गोडी बहर छाटण्या जवळपास एक महिना लांबणीवर गेल्या परिणामी हंगाम प्रभावित झाल्याची स्थिती होती छाटणीची कामे एकदाच दाटल्याने अनेक भागात मजुरांची टंचाई दिसून आली.
शेतकऱ्यांनी अशा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात हंगाम मोठ्या कष्टाने उभा केला आहे . त्यात निफाड तालुक्यात गारपिटीने नुकसान वाढलेले आहे. त्यामुळे लक्ष्यांक दिला असताना तो कमी होतो की पूर्ण होतो हे यंदा पाहणे अपेक्षित आहे.