सोलापूर मधील युवा शेतकरी अभिजीत पाटील सध्या अधिक चर्चेत आहेत . अभिजीत हे सिविल इंजिनियर आहेत .शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिजीत नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेती करायचं ठरवलं, सुरुवातीला त्यांनी जवळपासच्या शेतीची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला .ते सध्या लाल केळीची शेती करत आहेत .चार एकरात त्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे.
तीन वर्षापूर्वी
अभिजीत पाटील या तरुणाने इंजीनियरिंग शिक्षण डी वाय पाटील कॉलेज पुण्यातून घेतले आहे .2015 मध्ये त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला .अभिजीत पाटील यांनी चार एकर शेतीमध्ये लाल केळी करायचे ठरवले व या पासून त्यांना अधीक फायदा मिळत आहे. त्यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी उत्पादन घेतले त्यावेळीमाल कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय घेतला .त्यांनी त्यांची मार्केटिंग कौशल्य वापरले, व पुणे ,मुंबई ,दिल्ली, येथील रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये केळी विकली.
चार एकरात साठ टन केळी
अभिजीत पाटील यांनी चार एकरात साठ टन केळी उत्पादन घेतले असून सगळ्या खर्च काढला तर त्यांना 35 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. मागच्या काही दिवसापासून मेट्रो शहरातील उच्च वर्गात लाल केळीची चांगली मागणी वाढली आहे.
लाल केळ्याची किंमत
इतर केळी पेक्षा लाल केळीला सध्या चांगलीच दर मिळत आहे .त्याचा दर 50 ते 100 रुपये आहे. लाल केळीचे झाड मोठं असतं. त्याचबरोबर ते गोड सुद्धा असतं .एका फनीमध्ये 80 ते 100 केळी असतात. त्याचं वजन 13 ते 18 किलोच्या दरम्यान असतं.
आरोग्यासाठी लाल केळी अधिक उत्तम
लाल केळी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याची साल ही लाल असते. त्याचबरोबर त्याचे फळ काही प्रमाणात पिवळ्या रंगाचे आहे. त्यामध्ये शुगर मर्यादित असते. त्याचबरोबर ही केळी कॅन्सर व हृदयरोगापासून लोकांना दूर ठेवते .रोज एक केळी खाल्ल्याने सुद्धा आवश्यक असलेली ऊर्जा निर्माण होते. ही केळी खाल्ल्याने मधुमेह आजार होण्याची शक्यता अधिकच कमी होते.