शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे, येथे करा अर्ज..

आता खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करत आहेत . पेरणीची लगबग पाऊस पडताच सुरू होणार आहे. शेतकरी त्यासाठी लागणाऱ्या बियाणांचे नियोजन मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करत आहेत . विविध पिकांचे बियाणे वाटप करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका कृषी विभागाने केले आहे.

प्रमाणित बियाणे अंतर्गत व महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पिक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाणांचे वितरण करण्यात येते. शेतकऱ्यांनी त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. एका एकरासाठी लागणारे बियाणे पीक प्रात्यक्षिकमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहेत, तर निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण योजनेत त्यांच्या अर्ज केलेल्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे ५० टक्के अनुदानावर मिळणार आहेत.

येथे करावा अर्ज… 

शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर आपल्याला लागणाऱ्या बियाणांचा अर्ज करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. जूनच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्याअखेर बियाणांचे वितरण अर्जदार शेतकऱ्यांना केले जाईल. आठ अ, बैक पासबुक, आधार कार्ड ,पोर्टलवर सातबारा, झेरॉक्स आवश्यक आहे.

Leave a Reply