शेतकऱ्यांना मिळणार आता युरिया खत, युरियाचा अडीच हजार मे. टन साठा केलाय खुला…

नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी १०० % पूर्ण झाली आहे , पिकेही जोमामध्ये उभी आहेत. पिकांची वाढ चांगली व्हावी, यासाठी शेतकरी युरिया पिकांना टाकत आहे .बाजारात मागील काही दिवसांपासून युरिया खत उपलब्ध नव्हते. युरिया खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढल्यामुळे कृषी विभागाकडून जिल्ह्यातील युरिया खताचा दोन हजार पाचशे मेट्रिक टन बफर स्टॉक खुला करण्यात आला आहे .

खरीप हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यामध्ये पावणे आठ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते, २३ जुलै पर्यंत जिल्ह्यात सव्वासात लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे . सध्या कापूस, मूग, सोयाबीन, उडिदासह अन्य पिकेही चांगली आहेत . शेतकऱ्यांनी अधूनमधून पडणाऱ्या पावसावर पिकांची पेरणी केली आहे , सध्या पिके जोमात आहेत. शेतकऱ्यांकडून खताची मात्रा पिकांची वाढ होण्यासाठी देण्यात येते . त्यात युरिया खताला जास्तीचे प्राधान्य शेतकरी देत असतात .

त्यामुळे युरिया खताला जास्त मागणी असते . जिल्ह्याला खरीप हंगामासाठी २ लाख ४१ हजार ८३० मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे पाठवली होती . तर २ लाख ६०० मेट्रिक टन खत कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे .

मागणी ६४ हजार, मिळाले ३६ हजार टन

सर्वात जास्त युरिया खताचा वापर पेरणीनंतर केला जातो. त्यासाठी ६४ हजार मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. परंतु, आयुक्तालयाकडून ५३ हजार ९०० मेट्रिक टन खत वाटप करण्यात आले. पिकांची जोमात वाढ व्हावी म्हणुन युरिया टाकला जात असतो काही तालुक्यांमध्ये युरियाची चणचण भासत आहे. त्यामुळे अडीच हजार मेट्रिक टन खताचा शिल्लक साठा कृषी विभागाने खुला केला आहे.

३१ मार्च अखेर ९० हजार ४६३ टन होते शिल्लक..

९० हजार ४६३ मेट्रिक टन खाताचा साठा ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत शिल्लक होता. त्यामुळे एकूण दोन लाख पाच हजार ६४५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे . त्यापैकी एक लाख एकतीस हजार सातशे अठावीस मेट्रिक टन खत विकले आहे . एक लाख एकोणीस हजार नऊशे सोळा मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. त्यापैकी जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत एक लाख ३७ हजार २६८ वाटप झाला आहे , तसेच १ लाख ६१ हजार १८२ मेट्रिक टन खतांचा पुरवठा १ एप्रिलपासून आजपर्यंत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *