success story : जालना जिल्ह्यातील नवनाथ सिंगारे हे उत्तम व्यवस्थापनातून करत आहेत ५२ एकर शेती,वाचा सविस्तर …

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक या गावाचे राहणारे नवनाथ सिंगारे यांची ५२ एकर शेती आहे. त्यांची शेती त्यांच्या गावापासून तीन किलोमीटरवरील सोमठाणा शिवरात येथे आहे. शेतीची ही जबाबदारी त्यांच्या 31 वर्षी वयाच्या कृषी पदवीधर अजिंक्य शिंगारे या मुलांनी घेतली आहे. व वडिलांचे मार्गदर्शन, आई संगीता व पत्नी कोमल यांची त्यांना समर्थ साथ आहे. त्यांच्या कुटुंबात सृष्टी हे लहान अपत्य आहे.

…असे आहे शेतीचे व्यवस्थापन

त्यांची फळबाग व हंगामी पीकपद्धती  अशी आहे. मोसंबीचे क्षेत्र पंचवीस एकर असून वीस ते अलीकडे दीड वर्ष अशी पाच टप्प्यात लागवड केलेली मोसंबीची 4500 झाडे आहे. एकरी सरासरी सात टन उत्पादन मिळते.

प्रति टन 15 ते 40 हजार रुपये दर मिळतो. पपईचे आंतरपीक हे दोन वर्षांपूर्वीच्या साडेनऊ एकरातील मोसंबी बागेत करण्यात आले आहे. चार वर्ष वयाची भगवा डाळिंबाची बाग अडीच एकरात आहे.

हंगामी पिके

सहा ते दहा एकर कपाशी, पाच एकर सुधारित बीडीएन ७११ व गोदावरी वाणाच्या तुरीची लागवड असते. पंधरा एकर सोयाबीन , रब्बीच्या पिकांमध्ये चार ते पाच एकरात मालदाडी ज्वारी, हरभरा गहू असतात.

गव्हाचे 12 पासून 16 ते 17 क्विंटल, ज्वारीचे 14 ते 15 क्विंटल, तुरीचे आठ नऊ क्विंटल, कपाशीचे एकरी दहा ते 14 क्विंटलपर्यंत उत्पादन
अजिंक्य घेतात. नऊ एकरातील बाजरीतून एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन मागील रब्बीत मिळाले. त्यांना प्रति क्विंटल वर २८०० रुपये दर मिळाला.

सिंचन स्रोत केले बळकट

नवनाथ यांनी वारंवार उद् भवणारा दुष्काळ व कमी पावसाची स्थिती लक्षात घेऊन सिंचन स्रोत बलकट करण्यावर भर दिला. आज त्यांच्या सहा विहिरी असून जवळच्या सोमठाणा धरणावरून दोन वेळा पाईपलाईन केली आहे. त्यांनी कृषी विभागाच्या सामूहिक शेततळे योजनेतून शेततळे घेतले आहे.

खोलीकरण व पुनर्भरण सर्व विहिरीचे केले आहे. पूर्वी सात एकरात ठिबक सिंचन होते, अजिंक्य यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठिबकखालील क्षेत्र 22 एकरावर वाढवले आहे. सिंचन व्यवस्था केल्याने 2012 व त्यानंतरच्या दुष्काळात मोसंबी व अन्य बागा वाचविता आल्या. त्यांच्या परिसरातील एका शेतकऱ्यांनी ही प्रेरणा घेऊन आपल्या शेतीत शाश्वत पाण्याची सोय केली. सिंनगारे यांच्याकडील विहिरीमधून सुमारे अकरा गावांना दुष्काळात पाणी देण्यात आले.

शेतकरी कंपनीची स्थापना

2022 मध्ये अजिंक्य यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून अजिंक्य पाटील शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. 370 सभासद त्या माध्यमातून जोडले. गहू, हरभरा बिजोत्पादन कंपनीच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न आहेत. बदनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून एक गाव एक वाण संकल्पना अंतर्गत कपाशी उत्पादन, कापूस गाठीचे कंपनीद्वारे उत्पादनाचे प्रयत्न सुरू आहेत.

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी

– सिंनगारे कुटुंब सन 1990 पासून शेतातच वास्तव्यास आहे. त्यामुळेच शेतीचे व्यवस्थापन अधिक सुकर करण्यात आले आहे.
– बांधावर नवनाथ यांनी सांगाची 47 झाडे लावली होती. त्यांचा वारसा चालवीताना अजिंक्य यांनी केशर आंबा 50, नारळ 70, व व जांभूळच्या 30 झाडांची लागवड बांधावर केली आहे.
– माल साठवणुकीसाठी 30 बाय 15 बाय फूट आकाराची तीन गोदामे तयार करण्यात आले.
– शेताच्या प्रत्येक भागात जाणे शक्य व्हावे यासाठी बांधलगत रस्त्याचे नियोजन करण्यात आले.
– रॉटव्हायलर , कारवान, जर्मन शेफर्ड , र्लब्राडोर प्रसिद्धव दोन गावरान जातीचे स्वन पालन.
-चार जोडपी मध्य प्रदेशातील त्यांनाच तैनात करून मजूर व्यवस्थापन केले व दहा मजुरांना कायम रोजगार दिले.
– मुख्यमंत्री व कुसुम मोजण्यातून एकूण तीन सौर पंप घेतले. शिवरात वीजबिघाड झाली तरी शेतकऱ्यांचा मदतीला अजिंक्य सदैव तत्पर असतात.
मजुरांची समस्या पाहता अधिकाधिक कामे यंत्राच्या साह्याने करण्यावर भर दिले. ट्रॅक्टर्स, मशागत, पेरणी यंत्रे, कॉटन श्रेडर, थेशर, ब्लोअर, रोटावेटर,
पल्टि नागर आधीची पंधरा वर्षापासून भर.

पशुपालनाची भक्कम साथ

अजिंक्य आणि आजोबांच्या काळापासून सुरू असलेले जनावराचे संगोपन पुढे सुरू ठेवले. आज त्यांच्याकडे 30 जनावरे आहेत. यात 13 देशी गाई आहेत. दिवसा शेतातील घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली जनावरांना चारा-पाणी करण्यात येते.

रात्रीच्या वेळी त्यांना गोठ्यात बांधले जाते. व त्यांच्याकडे 2 शेळ्या देखील आहेत. सुमारे 40 ट्रॉली शेणखत वर्षकाठी मिळते. 52 एकर शेतीची गरज लक्षात घेऊन शेणखत बाहेरून आणले जाते. अजिंक्य यांनी रासायनिक व सेंद्रिय खत असा 50-50 टक्के पाच वर्षापासून शेतीत वापर करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

‘बायोगॅस युनिट’ बारा वर्षापासून कार्यरत केले आहे. व त्यातून अन्या इंधन खर्च आणि घरचा स्वयंपाकासाठीचा खर्च यात मोठी बचत केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *