राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये आता शेतकऱ्यांना रासायनिक आणि सेंद्रिय खताला अनुदान दिले जाणार आहे. आणि याच्यासाठी ची मंजुरी 21 सप्टेंबर २०२३ रोजी एक शासन निर्णय निर्गमित करुन देण्यात आलेली आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून फळबाग लागवड करताना यामध्ये आंबा असेल किंवा इतर फळ पिकांच्या लागवडीसाठी चे नवीन इस्टिमेट जाहीर करण्यात आलेले आहे. याच्या माध्यमातून आता रासायनिक आणि सेंद्रिय खत शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. परंतु ह्याच्या मध्येजॉब कार्ड धारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.
परंतु बरेच सारे अल्प ,अत्यल्प ,भूधारक, शेतकरी जॉब कार्ड नसल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होत नाहीत. अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजने ची इच्छा असून सुद्धा लाभ घेता येत नाही, याच्यासाठी 2018 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही सुरू करण्यात आलेली आहे. दहा पेक्षा जास्त फळबागांच्या लागवडीकरता या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते .
या योजनेअंतर्गत यापूर्वी आपण जर पाहिले तर फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जात होते . परंतु आता ठिबक सिंचनाचे अनुदान आता वजा करून त्याच्याऐवजी शेतकऱ्यांना रासायनिक आणि सेंद्रिय खताला अनुदान देण्यासाठी या जीआर च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
याच संदर्भातील 21 सप्टेंबर 2023 चा हा महत्व पूर्ण जीआर आपण पाहू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार तेवीस-चोवीस पासून राबवण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता मिळणेबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता . या मध्ये पार्श्वभूमी देण्यात अली आहे. या शासन निर्णयामध्ये सन २०२३ -२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी रासायनिक व सेंद्रिय खते देणे ही बाब समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली . आणि याच्या साठी परिशिष्ट अ अशाप्रकारे परिशिष्ट अ देण्यात आलेली आहे.
हे अनुदान तीन वर्षात 50 टक्के 30टक्क्याने 20 टक्के अशा प्रमाणामध्ये देण्यासाठी याठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी आपण इंटिमेन्ट येथे पाहू शकता परिशिष्ट अ च्या माध्यमातून जोडण्यात आलेली आहे. याच्या मध्ये कलमे लागवडीसाठीचे जे अनुदान आहे ते अनुदान याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ज्याच्या मध्ये झाडांची संख्या सामग्री आणि या सामग्रीचा अंतर्गतच रासायनिक खतांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच आंबा कलमे असेल आंबा कलमे सदन लागवड असेल, काजू कलमे असतील, पेरू कलमे असतील . याची वेगवेगळी लागवडीसाठी सुद्धा इंटिमेन्ट या मध्ये देण्यात आली आहे. जसे की आता आंबा कलम मध्ये पहिले तर खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे नांग्या भरणे आणि त्याच्या अंतर्गत एक बाब समावेश करण्यात आलेली आहे ती म्हणजे खत देणे.
ज्याच्या मध्ये मजुरीचा खर्च आणि सामग्री , सामग्री म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या रासायनिक खत आणि सेंद्रिय खत आणि याच्या टाकण्यासाठी जो काही मजुरीचा खर्च आहे तो देण्यात आला आहे. हीच बाब आता या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. ज्याच्या मध्ये आपण पाहू शकता आंबा लागवडीसाठी प्रति हेक्टरी सहा हजार 430 रुपये पहिल्या वर्षासाठीचा अनुदान असणार आहे. दुसऱ्या वर्षासाठी आपण जर पाहिलं 8895रुपये तिसऱ्या वर्षासाठी दहा हजार रुपये असे एकूण 26हजार 181 रुपये एवढे अनुदान आता या खताला आंबल्या साठी प्रति हेक्टर या प्रमाणे आंबा कलम लागवड असेल किंवा काजू कलम असतील किंवा इतर काही कलमे असतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रत्येक लागवडीसाठी खतासाठी असणारे अनुदान यांच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेले आहे.
याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक लागवडीसाठी वेगवेगळे अनुदान आहे. आता डाळींबासाठी जी लागवड आहे . डाळींबाच्या खतासाठी 41हजार 534 रुपये प्रति हेक्टर एवढे अनुदान दिले जाणार आहे. अशा प्रकारची नवीन इंटिमेट जाहीर करण्यात आलेली आहे. याच इंटिमेट च्या आधारे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे,
या योजनेचा जीआर आपल्याला पाहण्यासाठी खालील लिंक वर जाणे .
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता मिळणेबाबत या वर जाऊन PDF डाउनलोड करा .