नगर जिल्ह्यातील राहता तालुका हा पेरू पिकासाठी खूप प्रसिद्ध आहे .या जिल्ह्यातील गणेश नगर मधील काले कुटुंब हे प्रगतशील शेतकरी कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे पाच किलोमीटरवर वाकडी येथे त्यांची चाळीस एकर शेती आहे.
कुटुंबातील युवा सदस्य विक्रांत हे आपल्या कुटुंबासोबत शेतीचे मुख्य व्यवस्थापन पाहतात. ते आयटी इंजिनिअर असून लॅंडस्केप डिजाईनचे शिक्षण त्यांनी घेतले आहे .गुवाहाटी ,पुणे डेहराडून, येथे चार वर्षे खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर त्यांनी नोकरी केली. परंतु घरच्या शेतीचा सर्वात जास्त व्याप असल्यामुळे पूर्ण वेळ त्यातच लक्ष घालण्याचा विचार त्यांनी केला .त्यांनी बदलती परिस्थिती आणि बाजारपेठ नुसार फळपीक घेणे त्यांना योग्य वाटले.
अशी आहे फळबाग केंद्रित शेती
डाळिंब सिताफळ प्रत्येकी सहा एकर, मध्ये लागवड केलेली आहे. पेरू आणि आंबा यांची तीन एकर मध्ये लागवड केली. सफरचंद हे दोन एकर तसेच जांभूळ हे दोन एकर चिकू एक एकर अशी सर्वसाधारण पिके ते घेत आहेत. चिकूची वीस वर्षापासून ची बाग आहे.
त्यांना फळबाग पिकाचे उत्पादन सुरू होऊन तीन ते चार वर्षे झाली आहेत .काही पिके उत्पादन सुरू होण्याच्या अवस्थेत आहेत.आज ४० एकरांपैकी सुमारे २८ एकर क्षेत्र त्यांनी फलोत्पादनाखाली आणले आहे. ते या फळ पिकांना 75 टक्के सेंद्रिय खत तसेच 25% रासायनिक खतांचा वापर ते करतात.
त्यांच्या इथे आठ टाक्या असे दोन संच आहेत, एकूण 16 टाक्या आहेत. त्यामध्ये सॅलरी सेंद्रिय द्रावणे तयार केली जातात.
फळबागांना पाखरांचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी आंबा आणि सफरचंदाला यावर्षी होम पेपर बॅगेचे अच्छादन केले आहे त्यामुळे गारपिटीपासूनही फळ त्यांना वाचवता आले आहे.
त्यांनी सव्वा एकरामध्ये दीड कोटी लिटर क्षमता असलेले शेततळे केले आहे .आठ किलोमीटर वरून शेतापासून नर्सरी पर्यंत पाईपलाईन देखील केली आहे. तसेच तीन विहिरी व सिंचन व्यवस्था त्यांनी केली आहे.
उत्पादन व विक्री
व्यवस्थापन उत्कृष्ट असल्यामुळे गुणवत्ता पूर्व उत्पादन त्यांना मिळते. व त्यामुळे बाजारपेठ मध्ये सुद्धा चांगली मागणी असते. व दरही चांगले मिळतात .अनेक फळांची जागेवरच व्यापाऱ्यांकडून खरेदी होते.
त्यांच्याकडे सफरचंदाचे दोन वाण आहेत .सफरचंदाची रोपे ही त्यांनी हिमाचल प्रदेशातून आणले आहेत. तसेच त्यांनी थायलंड वरून पांढरे जांभळ्याची रोपे आणून 100 झाडांचा प्रयोग केला. पांढरी जांभळे चवीला गोड असून यंदा त्या जांभळ्यांना दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे .त्यांची विक्री शिर्डी, मुंबई, वाशी, श्रीरामपूर या बाजारात झाली.
पांढऱ्या जांभळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे झाड हे आठ ते दहा फुटापर्यंतच वाढते त्यामुळे फळ तोडणी करणे सोपे जाते. लागवडीनंतर तीनच वर्षात उत्पादन सुरू होते व याला पाणी देखील कमी लागते.
एकत्रित कुटुंबाचा आदर्श
काले कुटुंबात एकूण 24 सदस्य आहेत. शेतीनिष्ठ शेतकरी विजयचंद हे विक्रांत यांचे आजोबा आहेत. त्यांना जयेंद्र, रुपेंद्र, कैलास व आनंद अशी चार मुले आहेत .या सर्वांनी आपले व्यवसाय व जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. विक्रांत यांची वडील हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत .तेही शेती पाहतातच शेतकरी प्रश्नावर त्यांचा लढा सुरू असतो .नगर जिल्ह्यामध्ये साठ वर्षापासून चर्चेत असलेला निळवंटे धरणाची पाणी सोडण्याची चाचणी नुकतीच झाली आहे. त्यांनी न्यायालयीन याचिका कामाची, अंमलबजावणी, निधी, यामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. विक्रांत यांचा चुलत भाऊ संकेत यांची त्यांना खूप मोठी मदत होते.