हंगामा आधीच पुण्यात द्राक्ष दाखल, नेहमीच्या तुलनेत दुप्पट दराने विक्री प्रति किलो दर किती?

शेती उत्पादनातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी.  शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग राबवण्यात येत असून पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून हंगामपूर्व उत्पादन घेण्याचा ट्रेड अलीकडील काही वर्षात रुजला आहे . हे शेतकरी द्राक्षाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी साधारण दीड महिना आधी द्राक्षाचे उत्पादन घेतात.  बाजारात माल कमी असल्याने त्यांना नेहमीच्या तुलनेत दुप्पट दर मिळत आहेत . रविवारी पुण्यामध्ये द्राक्षाची पहिली आवक झाली.

गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, जुन्नर, येथून द्राक्षे येतात . सांगली ,सातारा, सोलापूर इथून द्राक्षाची आवक होते.  द्राक्षाचा हंगाम साधारण डिसेंबर अखेरीस सुरू होईल.  एप्रिल पर्यंत चालतो.  मात्र सध्या सांगली, बारामती, फलटण येथून  मालाची अवाक होत आहे.  रविवारी सुमारे दीड ते दोन टन आवक झाली.

घाऊक बाजारामध्ये एक किलो द्राक्षासाठी सरासरी 100 रुपये दर मिळाला , अशी माहिती फळांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली . द्राक्षाच्या वेलीची छाटणी केल्यानंतर साधारण शंभर ते सव्वाशे दिवसात द्राक्ष उत्पादन हाती येते.  त्यामुळे काही शेतकरी जुलैमध्ये वेलीची छाटणी करतात.  त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबर च्या सुरुवातीला द्राक्ष तयार होतात.  मात्र अशाप्रकारे आधीच उत्पादन घेताना उत्पादकतेवर काही प्रमाणात परिणाम होतो . हंगामाच्या तुलनेत या काळात एकरी कमी उत्पादन मिळते.

पुण्यामध्ये 80 टक्के द्राक्ष सांगलीतून.

◼️ पुणे बाजारात येणाऱ्या 80 टक्के द्राक्ष सांगली जिल्ह्यामधून येतात.

◼️ साधारण 15 डिसेंबर पासून ही आवक सुरू होते.

◼️ सोलापूर जिल्ह्यातून मार्चमध्ये द्राक्षांची आवक होते.

◼️नाशिकची द्राक्ष प्रमुख्याने मुंबई यांनी मध्यप्रदेशात पाठवली जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *