सध्या खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून शेतकऱ्यांची रब्बी कामांची लगबग वाढली आहे. रब्बी हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, कीटकनाशके ,रासायनिक खते खरेदी केली जाणार आहेत. ही सर्व खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना गाफील राहिल्यास फसवणूक होईल .
रासायनिक खत ,बियाणे,खरेदीकरतांना कुणी व्यावसायिक बिल देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे , शेतकऱ्यांनी मिळालेले बिल पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, असेही कृषी विभागाने कळविले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांना पीक विम्यामुळे आर्थिक मदत मिळते. यासंबंधी विशेष काळजी घेत शेतकऱ्यांनी रबीचे नियोजन करावे.
शेतकऱ्यांनी आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, खत व कीटकनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी. यातून फसवणूक टाळता येते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे कुठलीही तक्रार असल्यासतक्रार नोंदवावी. तक्रारीची दखल घेत दोर्षीवर कठोर कारवाई केली जाईल . – संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा
खरेदी केलेल्या बियाणे खते यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी..
खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेस्टन, पिशवी, टेंग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सीलबंद आहे कि नाही याची खात्री करावी. पाकिटावरची शेवटची मुदत पाहून घ्यावी. खते, बियाणेच कीटकनाशके एमआर- पी पेक्षा जादा दराने खरेदी करू नयेत, कीटक- नाशके ,खते बियाणे यांची अंतिम मुदत तपासा .
कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी..
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपल्या कृषी निविष्ठांशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून त्या तक्रारीची दखल घेण्यात येईल .
सामूहिक खरेदीला प्राधान्य द्यावे..
वैयक्तिक खरेदीपेक्षा गटामार्फत सामूहिक कृषी निविष्ठांच्या खरेदीला महत्व द्यावे. ज्यामुळे कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही. गटामार्फत सामूहिक खरेदी केल्याने वाहतूक खर्चात सुद्धा बचत होण्यास मदत होईल . त्याचबरोबर दरामध्येही सूट मिळण्याची शक्यता असते.
खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून करा..
खते ,बियाणे त्यांच्या खरेदीला शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी . बनावट, भेसळयुक्त कीटकनाशक ,बियाणे, खते, खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करावी. पावतीवर शेतकरी व विक्रेत्याची स्वाक्षरी आणि मोबाइल नंबर नोंद करून घ्यावी, पीक निघेपर्यंत पावती जपून ठेवावी.