Kharif season : खरीप हंगामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव: उत्पन्नात २०% वाढ, शेतकऱ्यांसाठी नवा युग..

Kharif season :  भारताच्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरामुळे खरीप हंगामात पिकांच्या उत्पन्नात तब्बल २०% वाढ झाल्याचे समोर आले आहे. हवामान अंदाज, पीक आरोग्य निरीक्षण, सिंचन नियोजन आणि बाजारभाव विश्लेषण यामध्ये AI चा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक निर्णय घेता आले, आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला.

 

🌾 महाराष्ट्रात AI चा पायलट प्रयोग यशस्वी महाराष्ट्र राज्याने जून 2025 पासून खरीप हंगामात AI चा वापर सुरू केला. ऊस, सोयाबीन, भात आणि मका यांसारख्या पिकांवर AI आधारित सल्ला देणारे ‘विस्तार पोर्टल’ कार्यरत करण्यात आले. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना हवामान, मातीचा पोत, कीटक नियंत्रण, सिंचन गरज, आणि बाजारभाव यांची माहिती मिळत आहे. राज्य सरकारने यासाठी ₹560 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे.

 

📊 उत्पन्नवाढीचे ठोस परिणाम ICAR आणि IMD च्या संयुक्त अभ्यासानुसार, AI च्या मदतीने शेतकऱ्यांनी पिकांची लावणी, फवारणी, आणि काढणी अचूक वेळेत केली. परिणामी, उत्पादनात १५–२०% वाढ झाली. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी स्मार्टफोनवरून AI आधारित सल्ला घेतला, त्यांना उत्पादन खर्चातही १०% पर्यंत बचत झाली.

 

📱 डिजिटल सल्ला आणि IVRS प्रणाली शेतकऱ्यांना AI आधारित सल्ला IVRS प्रणालीद्वारे मिळत आहे. मोबाईलवर कॉल करून शेतकरी हवामान, पीक स्थिती, कीटकनाशक गरज याबाबत माहिती मिळवू शकतात. याशिवाय, राज्य सरकार एक विशेष ॲप विकसित करत आहे, ज्यात बाजारभाव, गोदाम उपलब्धता, आणि पीक विमा माहिती एकत्रित दिली जाईल