मोसंबीसाठी विमा योजना लागू, संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर ..

मोसंबी पिकासाठी ही योजना अधिसूचित वर्धा ,बुलढाणा, हिंगोली, अकोला, नागपूर ,अहमदनगर अमरावती, धुळे, बीड ,परभणी ,पुणे, नांदेड, औरंगाबाद, जालना, जळगाव ,उस्मानाबाद ,सोलापूर या जिल्ह्यामधील अतिसुचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लाभ आहे.या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

या योजनेअंतर्गत मोसंबी तीन वर्षे वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

योजनेत मोसंबी पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

हवामान धोके – विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर-  शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर अवेळी पाऊस ,जास्त तापमान, जास्त पाऊस – ८०,००० – ४००० -ते ४४००
गारपीट- २६ ६६७- १३३४

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा. 

जिल्हे – विमा कंपनी नाव व पत्ता: 

1) अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग,, नाशिक, वाशिम, यवतमाळ ,धुळे, पालघर ,सोलापूर, रत्नागिरी, नंदुरबार, नागपूर-  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

2) बीड ,अकोला, औरंगाबाद, सांगली, वर्धा, ठाणे ,हिंगोली, सातारा, परभणी, जालना ,लातूर, कोल्हापूर, -एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

3) रायगड ,जळगाव, बुलढाणा ,नांदेड ,पुणे, उस्मानाबाद – भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग

1) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळबागांसाठी कुळाने,  भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात . मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

2) पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

3) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात.  त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा ,आठ अ उतारा, व पीक लागवड स्व घोषणापत्र ,फळबागेचा (Geo Tagging)  केलेला फोटो ,बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.  कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

4)  एक शेतकरी त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो . मात्र त्या फळ पिकांसाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.

5) शेतकरी मृग किंवा आंबिया पैकी एका बहारात भाग घेऊ शकतो.

6) एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादित विमा संरक्षण घेऊ शकतो.

7) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता,  विमा संरक्षित रकमेच्या 5% च्या मर्यादित असतो.  याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून देण्यात येतो.  मात्र विमा हप्ता 35 टक्के पेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्के पेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

8 ) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या  ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकांसाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपन्यांकडून देण्यात येणार आहे.  अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *