राज्यात थैमान घातलेल्या लम्पी स्कीन रोगापासून पशुधनाचे शंभर टक्के संरक्षण होणार आहे . यासाठी तांत्रिक बाबीचा विचार करून ‘लम्पी प्रोव्हॅक’ या लसीची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला . (आयव्हीबीपी) लम्पी स्कीन रोग प्रतिबंधात्मक लस पुण्यातील भारतीय पशुवैद्यकीय जैवपदार्थनिर्मिती संस्थेने निर्माण केली असून, ती राज्यात फेब—ुवारी 2025 मध्ये वितरित होणार आहे.
लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव राज्यात 2019 पासून सुरू झाला. पशुपालकांचे फार मोठे नुकसान त्यामुळे झाले आहे.आजही या रोगाचा प्रादुर्भाव अनेक जिल्ह्यांत चालूच आहे. अतिशय काटक असलेले देशी गोवंश देखील या रोगाला बळी पडत आहेत. शासकीय पातळीवर अलीकडील नवीनतम रोगाविरुद्ध पूर्णपणेपशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त असलेल्या या संस्थेने या लसीचे उत्पादन केले आहे.
साधारण 92 कोटी रुपये मृत झालेल्या जनावरासाठी राज्यातील पशुपालकांना सानुग्रह अनुदान वाटण्यात आले आहे. विशेष सहनियंत्रण कक्ष (वार रूम), टोल फ्री नंबर , लसीकरण यासह ‘माफसू’च्या सहकार्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करून उपचार प्रोटोकॉल, टास्क फोर्स निर्मिती करून बर्यापैकी या रोगावर नियंत्रण मिळवले आहे.
रोग नियंत्रणासाठी मोठा प्रयत्न केला आहे . परिणामी, एकूण पशुधनाच्या तुलनेमध्ये मृत्युदर हा 0.25 ते 0.27 टक्के राखण्यात यश आले. 1.40 कोटी एकूण गाय वर्गापैकी 80 ते 90 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण होत होते. या रोगाविरुद्ध देवी प्रतिबंधक लस शेळीसाठी 70 टक्केपेक्षा जास्तीचे संरक्षण पुरवत होती. तसेच विजातीय लसीऐवजी सजातीय लस वापरली तर 100 टक्के संरक्षण मिळेल . लम्पी प्रोव्हॅक या लसीची निर्मिती या तांत्रिक बाबीचा विचार करून होणार आहे.
त्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर), नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वाइन (एनआरसीई) हिस्सार, इज्जतनगर यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले,हरियाणा व भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्था (आयव्हीआरआय) बरेली, व पुण्यातील आयव्हीबीपी संस्थेला लसनिर्मिती करण्यासाठी हस्तांतरित केले. त्यामुळे जनावरांच्या वापरासाठी लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे.