देशामध्ये महाराष्‍ट्राची साखर उत्पादनात आघाडी कायम,वाचा सविस्तर ..

फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशामध्ये २५४ लाख टन साखर उत्पादित झाली असून . त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी मारली आहे. उत्तर प्रदेशात साखर उत्पादन ७९ लाख टन झाले असून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी देशात साखर कारखाने बंद होण्याचा वेग मंद आहे. ७१ साखर कारखाने यंदा बंद झाले आहेत.याच कालावधीत ९३ साखर कारखाने मागील वर्षी बंद झाले होते.

आता केवळ १३ साखर कारखाने महाराष्ट्रामधील बंद झाले आहेत. राज्यामधील तब्बल ५८ साखर कारखाने या कालावधीत मागील वर्षी बंद झाले होते. देशात साखरेच्या उत्पादनात यंदा महाराष्‍ट्राचा वाटा सर्वात जास्त राहील, अशी चित्र दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशाचा साखर उतारा १०.५ टक्के आहे ,म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत देशाचा साखर उतारा अधिक आहे. या कालावधीत मागील वर्षी तो ९.७८ टक्के होता.

महासंघाच्या आकडेवारीनुसार, देशामध्ये आता सध्या ५९९ पैकी ४६२ साखर कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू आहे. या मध्ये २५५९ लाख टन उसाचे गाळप झाले असून . या कालावधीत मागील हंगामात २६५५ लाख टनांचे गाळप झाले होते.२५९ लाख टन साखर उत्पादित झाली होती . कर्नाटकामध्ये मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत लवकर हंगाम संपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा कर्नाटकामधील ४० साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे.याच कालावधीत मागील वर्षी २५ साखर कारखाने बंद झाले होते. आतापर्यंत कर्नाटकामध्ये ४५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागील वर्षी ५१ लाख टन साखर उत्पादन तयार झाले आहे. यावर्षी गुजरातमध्‍येही गेल्‍या वर्षीच्या तुलनेत लवकर हंगाम संपेल अशी शक्यता आहे. आतापर्यंत ६ कारखाने गुजरातमध्ये बंद झाले आहेत. मागील वर्षी गुजरातमध्ये एकही कारखाना बंद झाला नव्हता.

प्रत्‍येकी ५ लाख टन उत्पादन कर्नाटक, महाराष्ट्र कमी.. 

यंदा साखरेचे उत्‍पादन देशामध्ये कमी होण्याचा अंदाज होता. महाराष्ट्रा‍तील ऊस पट्ट्यामध्ये साखर कारखाने अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. महाराष्ट्रातील हंगाम सुरु होण्याअगोदर साखर कारखाने फेब्रुवारीपर्यंत चालतील, असे सांगण्यात येत होते. मात्र अजूनही निडवा , खोडवा, उसाची तोडणी वेळेत होत नसल्यामुळे आणखीन हंगाम महिनाभर तरी चालेल वाटत आहे.

देशामध्ये एकूण उत्पादनाच्या तुलनेत महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, व कर्नाटकमध्ये ८५ टक्के उत्पादन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी १० लाख टनांनी उत्पादन जास्त झाले आहे. कर्नाटकात व महाराष्ट्रात ते प्रत्‍येकी सुमारे ५ लाख टनांनी कमी झाले आहे .

Leave a Reply