नमस्कार मित्रानो आज आपणास एक महत्त्वाची माहिती देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आपल्या विदर्भातील सर्वांत आवडते फळ म्हणजेच संत्रा 🍊 या पिकाबदल आपल्या विदर्भात भरपूर वर्ष पासून शेतकरी बंधू काम करत आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुद्धा घेत आहे. पण मागील काही वर्षांपासून फायटोप्थोरा नावाचा रोग संत्रा पिकांवर मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करत आहे . फायटोप्थोरा रोगाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे या मध्ये काही मुद्दे असेल काही प्रश्न काही सुचेना काही सुधारणा असेल तर नक्की सांगा ही विनंती. संत्रा मोसंबी पिकावर अवलंबून असणारे शेतकरी साठी फायटोप्थोरा रोगा बदल माहिती देण्यासाठी पहिले त्यांची माहिती जाणून घेऊ.
फायटोप्थोरा रोगाच्या वाढीसाठी पोषक कारणे-
लिंबू वर्गीय फळबागा आणि रोपवाटिकेत फायटोप्थोरा पॅरासिटिका आणि फा. सिटृॊप्थोरा या दोन बुरशी बदल जाऊन घेणे आवश्यक आहे. या बुरशी ३५° सेल्सिअस पर्यंत तापमान सहन करु शकते. उन्हाळ्यात २८° ते ३२° अतिशय कार्यक्षम राहुन हिवाळ्यात तग धरून राहते. फायटोप्थोरा फायटोप्थोरा ही जास्त विनाशकारी बुरशी असुन ती २४° ते २५ ° सेल्सिअस तापमानात चांगली कार्यरत राहते आणि तापमानात वाढ होताच अकार्यक्षम होते तेव्हा फायटोप्थोरा पॅरासिटिका पुन्हा कार्यक्षम होते अशाप्रकारे फायटोप्थोरा बुरशी संपूर्ण वर्षभर रोपवाटिकेत आणि ओलिताच्या भागात कार्यक्षम राहते. अपुऱ्या निचऱ्याची आणि भारी जमीन पटपाण्यामुळे भरपूर ओलावा राहणे अप्रतिरोधक खुंट आणि झाडाच्या बुडाशी सतत पाणी साचून राहणे ह्या बाबी रोगाच्या वाढीसाठी अतिशय पोषक ठरतात.रोगग्रस्त रोपवाटिकातून प्रामुख्याने फायटोप्थोरा मुख्य शेतात वाढत जाऊन जम बसवितो.
संत्रा वगीऺय फळबागांच्या रोपवाटिकेत फायटोप्थोरा लागण होण्याला खालील बाबी कारणीभूत आहे.
१) फायटोप्थोरा अप्रतिरोधक असणा-या मातॄ वॄक्षाचा (खृटांचा ) वापर
२) पटपाणी आणि सपाट वाफे पद्धती.
३) वाफ्यात बराच काळ पाणी साचून राहणे.
४) कमी उंचीवर डोळा बांधणे.
५) रोपवाटिकेसाठी तिचं ती जमिन वारंवार उपयोगात आणले.
६) जुन्या बगीच्या शेजारीच रोपवाटिका असणे.
७) माती व ओलिताचे पाण्यातुन रोगांची वारंवार लागणं
रोगाचे व्यवस्थापन:
संत्रा वगीऺय फळझाडात फायटोप्थोरामुळे होणा-या रोगांचे एकात्मिक स्वरुपात व्यवस्थापन करता येते. ज्यात पुढील बाबींचा समावेश होतो.
१) प्रतिरोधक मातृवृक्षाचा खूंटाचा वापर
२) यथायोग्य आंतरमशागत कामे
३) रासायनिक औषधोपचार
प्रतिरोधक मातृवृक्षाचा/खुंटाचा वापरलिंबू वर्गीय फळबागांच्या उत्पादक क्षम आयुष्य वाढविण्यासाठी सुयोग्य मातृवृक्षाची निवड ही एक मुलभूत व प्रमुख पायरी होय. म्हणून त्यांची निवड करताना हव्या असलेल्या लिंबू वर्गीय फळबागा तील गुणांसाठी आणि त्या क्षेत्रातील इतर रोग लक्षात घेऊन मातृवृक्ष निवडताना – मातृवृक्ष डोळ्या ची सुसंगतता लक्षात घ्यायला हवी.
जंबेरीची जरी चांगली वाढ होत असली तरी तो मातृवृक्ष फायटोप्थोराला बळी पडणारा आहे. जंबेरी आणि रंगपूर लाईमच्या इतर जातीतसुद्धा बरीच विविधता आढळून येते. सोअर आॅरेज आणि टाॗयफोलीएट आॅरेज फायटोप्थोराला जास्त सहनशील असले तरी सोअर आॅरेज टिॗस्टेझाला लवकर बळी पडणारा असल्याने टिॗस्टेझा विषाणुची समस्या नसलेल्या प्रदेशात मातृवृक्ष म्हणून वापरला जाऊ शकतो. फायटोप्थोरा मातीजन्य असल्याने एकदा का रोपवाटिकेत किंवा बगीच्यात फायटोप्थोराने प्रवेश केला तर ती एक नेहमी उद्भभवणारी समस्या बनते व नंतर समुळ नष्ट करणे कठीण होवून जाते. रोग बरा करण्याचा उपाय करण्यापेक्षा सुरुवातीलाच प्रतिबंध करणे ही उक्ती शिस्तीने पाळायला हवी. फयटोप्थोरा मुक्त प्रमाणपत्रित रोपवाटिकेतून रोपटे निवडायला हवीत ज्यांची डोळे बांधणी नऊ इंचाच्या वर केलेली असेल.
फायटोप्थोरा च्या जातीबद्दल माहिती घेऊ.
फायटोप्थोरा ची पहिली जात
१) मातृवृक्ष : सोअर आॅरेज
२) सहनशीलता : फायटोप्थोराला
३) लवकर बळी पडणारा : टिॗस्टेझा.
फायटोप्थोरा दुसरी जात
४) मातृवृक्ष: टाॗयफोलिएट
५) सहनशीलता फायटोप्थोरा टिॗस्टेझा
६) लवकर बळी पडणारा: एक्झोकाॅरटीस
फयटोप्थोरा तिसरी जात:
७) मातृवृक्ष: रंगपूर लाईम.
८) सहनशीलता: फायटोप्थोराला मध्यम
९) लवकर बळी पडणारा : एक्झोकाॅरटीस
९) फायटोप्थोरा
१० ) लवकर बळी पडणारा – ब्राऊन रॉट*
कलमा लावताना डोळा जमिनीचे पृष्ठभागापासुन शक्य तेवढ्या उंचावर राहील ह्याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरुन ओलीताचे पाणी डोळा बांधलेल्या जोडाला स्पर्श करणार नाही. जमिनीत पाण्याचा निचरा चांगला ठेवावा आणि पटपाण्यामुळे आळ्यात जास्त काळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आंतरमशागत कामे करतांना बूड आणि मूळांना इजा पोहोचू देवू नये.
रासायनिक नियंत्रण:
रोगाणू मातीजन्य असल्याने रोपवाटिकेत त्याचे पूर्ण निर्मूलन करणे कठीण होवून जाते परंतु परिवर्तीत आंतरमशागती द्यारे रोगाला नियंत्रण ठेवता येते.
१) लिंबू वर्गीय फळबागा पासून रोपवाटिका (पन्हेरी)
दुर असायला हवी.
२) दुषितीकरण टाळण्यासाठी रोपवाटिकेतील औजारे बागेतील औजरापासुन वेगळी ठेवावीत.
३) रोगग्रस्त माती आणि इतर साहित्य रोपवाटिकेत आणू नये.
बुरशीनाशक वापरून फायटोप्थोराची समस्या ब-याच प्रमाणात कमी करता येते.पंरतु पुणऺ करु शकत नाही.
ताम्रयुक्त बुरशीनाशक झाडावर फवारणी करणे.
ताम्रयुक्त बुरशीनाशक योग्य वेळी वापर केल्यास बूडकुज मूळकूज आणि डिंक्या रोगांना सुद्धा आटोक्यात आणता येऊ शकते.
नागपुरी संत्र्यांवरील व मोसंबी पिकावर फायटोप्थोरा ब्राऊन रॉट* नागपुरी संत्र्यांवर तसेच मोसंबी पिकावर मागील काही दिवसात फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची पहाणी करून वेळीच उपाय करावे, आणि संभाव्य नुकसान आहे. फायटोप्थोरा बुरशीची वाढ होत आहे. या रोगाची सर्वात गंभीर बाब म्हणजे फळ तोडणीच्या आधी फळांवर लक्षणे दिसत नाही. साठवण आणि वाहतुकीच्या दरम्यान संक्रमित फळे निरोगी फळात मिसळल्यास चांगल्या फळांना सुद्धा या रोगाची लागण होऊन प्रसार होतो. हा रोग फायटोप्थोराच्या दोन प्रजातींमुळे होतो. फायटोप्थोरा पाल्मिवोरा आणि फायटोप्थोरा निकोशियानी ज्यामध्ये पाल्मिवोरा ही प्रजाती जास्त आक्रमक आहे. या प्रजातीचा प्रसार हवेमार्फत होऊन तो झाडांवरच्या फळांना संक्रमित करतो. याचे व्यवस्थापन प्रतिबंधावर अवलंबून असते. जमिनीपासून २४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरून झाडाची छाटणी केल्याने या रोगाचे प्रमाण कमी करता येते.
जून-जुलै च्या दरम्यान किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची (१% बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३.० ग्रॅम / लिटर) फवारणी केल्यास दमट हंगामात फायदा. पाऊस जास्त पडल्यास आॅगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बुरशीनाशकाची पुन्हा फवरणी करावी, असे आवाहन .असा आहे हा रोगफायटोफोथोरा ब्राउन रॉट हा एक फळांचा रोग असून सतत दमट हवामान आणि पाण्याचा निचरा न होण्याशी संबंधित असतो. पावसाळ्याच्या उत्तरार्धात (मध्य ऑगस्ट ते ऑक्टोबर) जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव सामान्यत: दिसून येतो. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने सुरवातीला परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या फळांवर आढळून येते.
संत्रा फळपिकामध्ये आंबिया बहार नैसर्गिकरीत्या येतो. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहार घेण्याकडे असला तरी फळांची वाढ विषम परिस्थितीत होत असते. उदा. थंडीमध्ये फुलांचे फळात रूपांतर होते, त्यानंतर वाढीच्या अवस्थेत कडक उन्हाळा त्यानंतर पावसाळा अशा विपरीत अवस्थेतून फळे झाडावर आकार घेतात. वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ वाढते. फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो.
बुरशीजन्य रोगामुळे होणाऱ्या फळगळसाठी उपाययोजना
सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहिल्यास रोगांचा प्रसार व तीव्रता वाढते. वाफे स्वच्छ ठेवावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. पाणी साठून राहणाऱ्या भागात फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉटमुळे होणाऱ्या फळगळसाठी संपूर्ण झाडावर फवारणी प्रति लिटर पाणी फोसेटिल एएल २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम. कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉटमुळे होणाऱ्या फळगळसाठी फवारणी प्रति लिटर पाणी बोर्डो मिश्रण ०.६ टक्के, किवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी)* २.५ ग्रॅम किवा कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी)* १ ग्रॅम. फळावरील कूज असल्यास याकरिता बेंझिमिडाझोल या वर्गातील बुरशीनाशके यांची फवारणी करावी. उदा. थायोफिनेट मिथाईल* २.५ ग्रॅम प्रति लिटर.
बुरशीजन्य फळगळ:
संत्रा फळझाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होते. पावसाळ्यात या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठांस विशेषतः फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींची बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात, परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते.
फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कूज लक्षणे:
जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी किंवा करडे डाग पडतात. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी-काळ्या रंगाचे होते. फळे सडून गळतात. फळ सडीच्या अवस्थेस ”ब्राऊन रॉट” किंवा तपकिरी रॉट असे संबोधतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड या कारणांमुळे हा रोग अधिक प्रमाणात फोफावतो.
कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे:
कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. पुढे त्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे, वाळणे ही या रोगाची सुरुवातीचे लक्षण आहे. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी व कडक होतात. दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.
डिप्लोडिआ फळावरील कूज:
डिप्लोडिआ बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो. चट्ट्याचा भागावर दाब दिला असता तो मऊ जाणवतो. पिवळा असलेला भाग नंतर करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो. कोरड्या उष्ण वातावरणात व झाडावर सल असलेल्या बागेत या बुरशीचा प्रकोप अधिक होतो. या वर्षी बऱ्याच ठिकाणी होणारी फळगळ डिप्लोडिआ बुरशीमुळे होत असल्याचे दिसते.
अपुऱ्या पोषणामुळे होणारी फळगळ
झाडाच्या जडणघडणीमध्ये पानांचे अनन्य साधारण महत्त्व असून, ती झाडांच्या विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक ती ऊर्जा तयार करून पुरवतात. झाडास पुरेशी पालवी नसल्यास अन्नद्रव्ये न साठल्यामुळे नवतीच फुटते किंवा फळे आली तरी गळून पडतात. पालवीनुसार फळे झाडास ठेवावीत. पालवी भरपूर असावी यासाठी शिफारशीनुसार खतांचा वापर करावा.
झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी. त्यामुळे त्यावरील सुप्तावस्थेतील रोगकारक निघून जातात. सल काढताना फांदीचा हिरवा भाग ५ सेंमी पर्यंत घेऊन सल काढावी. प्रत्येक वेळी सल काढणाऱ्या अवजाराचे निर्जंतुकीकरण करावे. सल काढलेल्या झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे त्याचा पुढील हंगामावर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये. खोल मशागतीमुळे झाडांची मुळे तुटतात, जमिनीची जलधारण शक्ती वाढून निचरा होत नाही व फळगळ वाढते.
बागेस संतुलित पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त व प्रमाणापेक्षा कमी पाणी देणे टाळावे. यामुळेसुद्धा फळगळ दिसून येते. पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा करण्याची काळजी घ्यावी. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात बागेत पाणी साचून राहिल्यास व पाण्याचा निचरा न झाल्यास फळांची गळ होते. पाणी साचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळींत एक याप्रमाणे उताराच्या दिशेने चर काढावेत.
गळलेल्या फळांची खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी. फळबागेत फळांचे ढीग कुठेही ठेवू नयेत. ते कीड व रोगाचे प्रसार करण्याचे काम करतात. सतत पावसाचे पाणी साचून राहिल्यास तसेच उष्ण वातावरणात बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा. अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता झाडाच्या वयानुसार खतांची शिफारशीत मात्रा द्यावी. दहा वर्षावरील झाडाकरिता ५० किलो शेणखत, ७.५ किलो निंबोळी ढेप, ८०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद, ६०० ग्रॅम पालाश प्रती झाड यासह ५०० ग्रॅम व्हॅम, १०० ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू, १०० ग्रॅम ॲझोस्पीरीलम, १०० ग्रॅम, ट्रायकोडर्मा, १०० ग्रॅम सुडोमोनास प्रति झाड द्यावे. नत्र हा अमोनियम सल्फेट स्वरूपात द्यावा.
सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन अंबिया फळांकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी. नॅप्थील ॲसेटिक ॲसीड (एनएनए)* १ ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम किवा २-४ डी* १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो अधिक कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी) १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी घेऊन या द्रावणाची फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांने घ्यावी. झाडावर पानांची संख्या कमी व पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास कॅल्शिअम अमोनियम नायट्रेट १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम* १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी ही फवारणी करावी.
त्यांच प्रमाणे जैविक पद्धतीने सुद्धा डिक्या या रोगांवर उपचार साठी:
१) गाईचे शेण १० किलो.
२) गोमूत्र १० लीटर
३) टाॅयकोडरमाऺ २५० मिली
४) सुडोमोनस २५० मिली
५) ताक १ लीटर
शेतकरी बंधूंनो व माझे कृषी मित्रांनो ही माहिती आपल्या भागातील शेतकरी साठी असुन आपल्या जवळच्या शेतकरी बंधू पर्यंत अवश्य माहिती पोहचवी या माहिती मध्ये आणखी काही मुद्दे किंवा सुचेना असेल तर अवश्य कळवा ही विनंती.
लेखक:
कार्तिक मिनाक्षी विलासराव देशमुख .
(लेखक हे ग्रामसेवक असून दगडधानोरा पंचायत समिती नेर येथे कार्यरत आहेत .)
#संपूर्णविदर्भातीलशेतकरीमजबुतकरणे
#यवतमाळजिल्हाशेतकरीआत्महत्यामुक्तकरणे #शेतकरीचचाऺसत्र #शेतकरी
#संत्रा