आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘मधाचे गाव’वाचा सविस्तर ..

आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘मधाचे गाव’वाचा सविस्तर ..

मधमाशांचे संवर्धन त्याचबरोबर मध उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘मधाचे गाव’  गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे . सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन तर विदर्भातील एका गावांमध्ये काम सुरू आहे . दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यात हे काम होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

अन्नसाखळीत मधमाशा हा महत्त्वाचा घटक असून त्यामुळेच त्यांच्या संवर्धनावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे, असे साठे म्हणाले . त्यानुसार (मांगर) महाबळेश्वर राज्यातील पहिले महत्त्वाचे गाव विकसित करण्यात आले.

त्यानंतर पाटगाव (कोल्हापूर)  अमझरी (अमरावती) ही दोन गावे मधाचे गाव म्हणून विकसित होत आहेत . त्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्याचे असे एक गाव उभारण्याचे नियोजन आहे ,त्याला गती देत भीमाशंकर (पुणे) बदलापूर (ठाणे) सह दहा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात याविषयी कामे होतील.

मधाचे गाव होण्यासाठी त्या गावाला पुरस्कार मिळालेला हवा.  तसेच ग्रामसभेचा ठराव पाहिजे असे काही असे निकष आहेत.  या अंतर्गत 50 लाख रुपयांचा निधी खर्च केला जातो.  मधमाशांविषयी जनजागृतीसाठी प्रदर्शनी सेल्फी पॉईंट राहतात. 

मधमाशांविषयी जागृती व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मेळावे होतात.  राज्यस्तरीय तज्ञ समितीचे गठन त्यासाठी करण्यात आले आहे . हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून राहतात.  मंडळाद्वारे उद्योजकांकडून उत्पादित मधाची हमीभावाने खरेदी होते.  त्यापूर्वी मधाची शुद्धता तपासली जाते.  त्यानंतरच त्यावर प्रक्रिया करावी लागते  असेही साठे म्हणाले.

राज्यामध्ये मध क्रांती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची नियोजन आहे.  पुण्यामध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करून मधुमित्र पुरस्कार आम्ही सुरू केले आहे.  असेही साठे म्हणाले.   मधमाशा जागतिक भाषा दिनाला महाबळेश्वरला कार्यक्रम घेतला आणि फेस्टिवल घेण्याची नियोजन आहे.  ‘हनी कॅफे’ अशी संकल्पना प्रस्तावित आहे ,चहा कॉफी मध्ये साखरेऐवजी आता मध टाकला जाईल दिवाळी किंवा इतर उत्सवात मधाची बाटली भेट द्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाईल.  ग्राहकांना मत खरेदीसाठी ऑनलाईन खरेदीचा मार्ग असावा.  याकरिता ॲप तयार केले जाईल असे साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *