रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. आपल्याला जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला रेशन कार्ड गरजेचे आहे. रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून देखील उपयोगी ठरते.
आपल्याकडे रेशन कार्ड नसेल तर आपली बरीच कामे रखडतात रेशन कार्ड नसेल तर आपल्याला धान्य सुद्धा मिळत नाही. मित्रांनो आपले रेशन कार्ड जर कधी हरवले तर आपण त्याची डिजिटल प्रिंट काढू शकतो या प्रिंट मुळे रेशन कार्ड काढणे सोपे जाईल.
या लेखामध्ये आपण रेशन कार्ड ची डिजिटल प्रिंट कशी काढायची याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुमच्याकडे रेशन कार्ड ची झेरॉक्स नसेल त्यासंबंधी कोणताच पुरावा नसेल तरीसुद्धा आपण रेशन कार्ड ची डिजिटल प्रिंट घरबसल्या मोबाईल वरून काही मिनिटात काढू शकतो.
मित्रांनो डिजिटल रेशन कार्ड प्रिंट काढण्यासाठी आपल्याकडे रेशन कार्डचा बारा अंकी नंबर असणे गरजेचे आहे. आपल्याकडे रेशन कार्ड नंबर नसेल तर हा नंबर आपण मोबाईल वरून कसा काढायचा याची सुद्धा सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे. रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आपण मोबाईल वरून एका मिनिटात काढू शकतो.
मोबाईल वरून रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आपण आधार कार्ड वरून काढू शकता.
आधार नंबर वरून राशन कार्ड चा नंबर काढा.आपण या लेखांमध्ये राशन कार्ड नंबर कसा काढायचा याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत . राशन कार्ड हे अतिशय मह्त्वाचे कागदपत्र आहे. शासकीय योजना असो शासकीय काम त्यासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून राशन कार्ड चा उपयोग केला जातो.आपल्याकडे रेशन कार्ड आहे परंतु ऑनलाईन केलेले नसेल तर आपल्याला राशन कार्ड वरील धान्य मिळत नाही. त्यामुळे आपले राशन कार्ड हे ऑनलाइन असणे गरजेचे आहे.
SRC नंबर काय आहे?
◼️ SRC नंबर हा राशन कार्ड चा बारा अंकी नंबर आहे. हा नंबर पीओएस मशीन मध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईट वरती सर्च केल्यानंतर त्या कुटुंबातील सदस्य तसेच राशन कार्ड वरील माहिती पाहता येते.
◼️ आधार कार्ड नंबर वरून राशन कार्ड नंबर कसा काढायचा .प्रथम मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून MERA RATION हे ॲप डाऊनलोड करा.
◼️ एप्लीकेशन व लोकेशन सुरू करा.
◼️ एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील.
◼️त्यामधून आधार सीडिंग हा पर्याय निवडा.
◼️ तुम्हाला राशन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर हे दोन ऑप्शन दिसतील.
◼️आधार कार्ड नंबर वर क्लिक करा आणि कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड नंबर टाकून घ्या व सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.
◼️तुमच्यासमोर Home state, home district, scheme, card number onorc elIgibity (one nation one ration card) इत्यादी माहिती पाहायला मिळेल.
वरील कार्ड नंबर हा तुमच्या राशन कार्ड चा SRC नंबर असेल.
रेशन कार्ड ची प्रिंट काढा मोबाईल वरून..
◼️ मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाईटवर ओपन करा.
◼️ मोबाईल वरती क्रोम ब्रावझर वरती साईड ओपन करावे.
उजव्या बाजूला वरती तीन रेषा डॉट वर क्लिक करा, आणि डेस्कटॉप साईड समोरील चौकोनात क्लिक करावे. म्हणजेच जशी कम्प्युटर वरती स्क्रीन असते तशी मोबाईल वरती दिसेल.
◼️ खाली दाखवल्या प्रमाणे रेशन कार्ड वरती क्लिक करून नो युवर रेशन कार्ड पर्याय निवडून मोबाईल मध्ये एक पेज ओपन होईल. व त्यामध्ये हिरवा कलर मधील अक्षरे कॅपच्या चौकोनात भरा. व व्हेरिफाय बटन वरती क्लिक करावे.
◼️ पुन्हा पेज ओपन होईल व त्यामध्ये रेशन कार्ड नंबर ओल्ड रेशन कार्ड नंबर समोरील चौकोनात आपल्या रेशन कार्डचा बारा अंकी एस आर सी नंबर टाकावा.
◼️ View report वरती क्लिक करा . आपल्या समोर रेशन कार्ड ची माहिती ओपन होईल.
◼️ निळ्या रंगातील प्रिंटर रेशन कार्ड वर क्लिक करून त्यानंतर आपल्यासमोर डिजिटल रेशन कार्ड ओपन होईल.
◼️ अशाप्रकारे रेशन कार्ड ची डिजिटल प्रिंट काही मिनिटातच मोबाईल वरून घर बसल्या काढू शकता.