पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे या पद्धतीने करा ऑनलाइन तक्रार..

विदर्भासह मराठवाड‌यात पावसाने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.  त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने नुकसान झाले असेल तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 72 तासांच्या आत कळवणे बंधनकारक आहे. विमा कंपनीला तक्रार,कशी करायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

या पद्धतीने करता येईल तक्रार

यासाठी तुम्ही मुळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.

१. सर्वात अगोदर तुम्हाला Crop insurance ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावा लागेल.
२. Continue as guest हा पर्याय त्यानंतर निवडायचा आहे .
३. यामध्ये पीक नुकसान हा पर्याय निवडा
४. पीक नुकसानाची पूर्वसचना या पर्यायावर क्लिक करावे .
५. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाका
६. पुढील टप्प्यात वर्ष-2024 योजना ,हंगाम-खरीप,आणि राज्य निवडावे .
७.नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा.यात पॉलिसी क्रमांक म्हणजेच पावतीचा क्रमांक टाका.
८. तुम्हाला पिकाची तक्रार ज्या गट क्रमांकमधील करायची आहे किंवा स्वतंत्र तक्रार करायची आहे तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करावी .
९. कशामुळे नक्की नुकसान झाले? याचा तपशील भरा. पिकांचा फोटो काढून सबमीट या बटनावर क्लीक करा
१०. तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket Id मिळणार आहे . यावरच तुम्हाला विमा मिळतो. त्यामुळे हा नंबर जपून ठेवा.

प्रधानमंत्री पीक विमाच्या वेबसाईटवरूनही करता येईल तक्रार..

पिकाच्या नुकसानाची तक्रार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला करता येईल, त्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या संकेतस्थळावर जा.

https://pmfby.gov.in/ या वेब साईड वरती जाणून त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिककरून तुमच्या पिकाचा विमा कोणत्या इंन्शूरंस कंपनीमध्ये काढला आहे ती कंपनी निवडून त्यामध्ये आपली सर्व माहिती भरा.

कृषीविभागाकडेही करता येईल तक्रार..

कृषी विभागाकडून हेल्पलाईन क्रमांकही यासाठी देण्यात आला आहे. शेतकरी 14447 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपल्या झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात. शेतकरी या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपल्या झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात.

Leave a Reply