गेल्या वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागेचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले होते हे नुकसान रोखण्यासाठी द्राक्ष पिकांवर आच्छादन करणे हा एक उपाय आहे त्यासाठी सरकारने द्राक्ष पिकांवर प्लास्टिकच्या आच्छादनावर अनुदान द्यावे असे शेतकऱ्यांनी मागणी केली होती.
अखेर ही मागणी पूर्ण झाली असून आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत द्राक्षांसाठी प्लॅस्टिक आच्छादनाला राज्य सरकारने ६ कोटी १४ लाख निधी वाटपास मान्यता दिली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के खर्च करावा लागणार असून, अनुदान ५० टक्के मिळणार आहे. या बाबत शासनाचे उपसचिव हे गो. म्हापणकर यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीमध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2022 23 मध्ये राबवण्यास मान्यता दिली आहे . 12 कोटी 16 लाख रुपयांचा कार्यक्रम या प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणार आहे . या योजनेच्या मंजूर निधी पैकी राज्य सरकारचा 40% तर केंद्र सरकारचा 60 टक्के इतका हिस्सा राहणार आहे. द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञानासाठी अर्थसाह्य’ हा प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात आला आहे. व त्यासाठी ६ कोटी १४ लाख निधी मान्य केला आहे.
या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना 50 टक्के खर्च करावा लागेल व सरकार 50% अनुदान देणार आहे. अशा पद्धतीने ही योजना राबविण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सहा कोटी चौदा लाख इतका निधी मंजूर केलेला आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेवर प्लास्टिक कव्हर बसवण्याच्या मागणीवरून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निदर्शनानुसार समिती स्थापन केली या समितीद्वारे ४२ हजार खर्च असल्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात आले होते.
लॉटरी पद्धतीने निवड
पुण्यातील औषधी वनस्पती व राज्य फलोत्पादन मंडळाचे संचालक नियंत्रण अधिकारी असतील. या प्रकल्पांतर्गत निधी व लक्ष्यांक वाटप द्राक्षाच्या क्षेत्रानुसार , जिल्हानुसार मंडलस्तरावरुन करण्यात येईल.
‘महाडीबीटी’ प्रणालीवर शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहेत व त्याची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. सक्षम अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिल्यानंतर आणि काम झाले आहे का ते तपासल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतील. त्यांना त्यांचे आधार कार्ड देखील लिंक करणे आवश्यक आहे.