PM Kisan : पीएम किसानचा 21 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये खात्यात जमा होणार…

PM Kisan : पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता अखेर जाहीर गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. बिहार विधानसभा निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे हा हप्ता काही काळ लांबणीवर पडला होता. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे.

👉 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशातील जवळपास 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यात हा हप्ता थेट जमा होणार आहे. 👉 पीएम किसानच्या अधिकृत एक्स (Twitter) हँडलवरून ही घोषणा करण्यात आली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 पीएम किसान योजनेतील आपला हप्ता मिळणार आहे की नाही हे तपासण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, अधिकृत वेबसाइटवरसुरुवातीला पीएम किसानच्या  https://pmkisan.gov.in/homenew.aspx अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  काही मूलभूत माहिती भरताच तुमची लाभार्थी स्थिती त्वरित पाहता येते. वेबसाइटवरील ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करून ‘डेटा मिळवा’ हा पर्याय निवडावा, आणि पुढील पृष्ठावर उपलब्ध होणाऱ्या माहितीमधून तुमचा हप्ता मंजूर झाला आहे की प्रक्रियेत आहे हे स्पष्टपणे कळते. ही पारदर्शक आणि सर्वांसाठी सहज समजणारी पद्धत शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेशी संबंधित सर्व अद्यतनांवर सहज नजर ठेवण्यास मदत करते, तसेच कोणतीही शंका न ठेवता आपल्या पात्रतेची खात्री देऊन प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनवते.