पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्यामध्ये माशा, गोचीड, गोमाशा व इतरबाह्य परजीवींचा प्रमाण वाढतं. या कीटकांच्या नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये किंवा जनावरांच्या अंगावर कीटकनाशकाची फवारणी केली जाते. अशा वेळी गोचीड नाशकांचा चुकीचा किंवा अयोग्य प्रमाणात वापर केल्यामुळे जनावरांमध्ये विषबाधा होते विषबाधा टाळण्यासाठी जनावरांच्या अंगावर गोचीडनाशक पवारताना काय काळजी घ्यावी या विषयाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
नमस्कार तुम्ही वाचत आहात कृषी २४ .कॉम , जनावरांमधील बाह्य परजीवींचा नियंत्रण करण्यासाठी गोचीड नाशकांचा वापर केला जातो. सर्व गोचीड नाशके अत्यंत विषारी असतात , त्याचा वापर करण्यापूर्वी त्याच्यासोबत आलेली माहिती पत्रिका पूर्ण वाचून त्याप्रमाणे त्याचा वापर करा.
कोणतेही दोन किंवा अधिक गोचीड नाशक एकत्र मिसळून वापरु नका. आजारी जनावरांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या गोचीड नाशकांचा वापर अजिबात करू नका. दुपत्या जनावरांमध्ये शिफारस केलेली गोचीड नाशक वापरावे. जनावरांच्या शरीरावर जखमा असल्यास गोचीड नाशकांचा वापर टाळावा कारण जखमेतून गोचीड नाशक शरीरात जाऊन अश्या वेळी जनावर दगावण्याची शक्यता असते. गोचीड नाशकांचा वापर केल्यानंतर जनावरांच्या तोंडाला मुसके घालावे जेणेकरून जनावरे गोचीड नाशके चाटणार नाहीत.
गोचीड नाशकांचा वापर केल्यानंतर जनावराच्या शरीर साबणाच्या पाण्याने पूर्ण स्वच्छ केल्यानंतरच मुसके काढावे. तसेच इतर काळजी घेताना पिकांवर कीटकनाशके फवारणी साठी वापरलेला पंप जनावरांच्या शरीरावर गोचीड नाशक पवारण्यासाठी अजिबात वापरू नये.
पिकांवरील कीटकनाशके गोचीड नाशक म्हणुन वापरू नयेत. जनावरांसाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचाच वापर करावा, शिफारसी नुसार कीटकनाशकांचा वापर केल्या नंतर औषधे कायम उंच ठिकाणी व्यवस्थित ठेवावे जेणेकरूनती जनावरे चाटणार नाहीत किंवा लहान मुलांच्या हाताला ती लागणार नाहीत .त्याचे रिकामे डबे खड्ड्यात पुरावेत . वापरामुळे विषबाधा झाल्यास पशुवैद्यकाकडून जाऊन तात्काळ उपचार करून घ्यावेत.
माळरान किंवा कुरणामध्ये चरणाऱ्या जनावरांना विशेषतः पावसाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाणअधिक असतं तर पाऊस पडल्यानंतर विविध झाडा झुडपांची झपाट्याने वाढ होते त्यामध्ये बराच वनस्पती या विषारीअसतात, विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे प्राण्यांना विषबाधा होते आणि त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते.
काही विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही मात्र त्यातील घटक हे दूध मौंस, अंडी या उत्पादनात उतरण्याची शक्यता असते. त्यातून ते उत्पादन खाणाऱ्याच्या शिरीरात जाण्याची शकयता असते. जनावरांमध्ये वनस्पतीमुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी काँग्रेस गवत, रुचकी, घाणेरी, कनेर, बेशरम धोत्रा, एरंड यासारख्या आपल्या परिसरात आढळणाऱ्या विषारी वनस्पतींची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून संभाव्य विषबाधा टाळता येईल.
हि माहिती आपणास महत्त्वाची वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी, अपडेट साठी आमच्या कृषी २४. कॉम चॅनेल ला नक्कीच जॉईन व्हा.