पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, असा घ्या लाभ

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण योजना राबवल्या जातात.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती संबंधित बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.  अशातच योजनेपैकी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणीसाठी अनुदान देण्यात येते.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबवली जात आहे.   भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीडरोग  मुक्त रोपे  निर्मिती करणे.  या योजनेचा उद्देश आहे.  या योजनेच्या माध्यमातून रोपवाटिका उभारणी करिता 1000 स्क्वेअर फुट मीटरच्या शेडनेट हाऊस पॉलीटेक्निकल सह साहित्य खर्चाच्या 50%.  दोन लाख 77 हजार 500 रुपयांच्या मर्यादेत पर्यंत अनुदान देण्यात येते.

या योजनेसाठी लाभार्थी पात्रता.

🔰 अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे  आवश्यक.

🔰 रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असावी.

🔰 महिला कृषी पदवीधारक यांना प्रथम प्राधान्य असेल.

🔰 महिला गट , महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य असेल.

🔰 भाजीपाला उत्पादक व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य असेल.

अर्जासाठी कागदपत्रे. 

◼️ सातबारा उतारा 8अ

◼️  आधार कार्ड.

◼️ बँक खाते व पासबुक.

◼️  जात प्रमाणपत्र.

◼️ कृषी पदवी बाबतची कागदपत्रे.

◼️  शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र.

रोपवाटिकेची उभारणी

तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्व समिती मिळाल्यानंतर रोपवाटिकेची उभारणी करावी . पूर्ण समिती मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत मध्ये काम सुरू करून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रकल्प उभारणीनंतर प्रथम टप्प्याचे 60 टक्के अनुदान हे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल.  उर्वरित 40% अनुदान हे रूपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री उचल झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांनी दुतीय मोका तपासणी केल्यानंतर मिळेल.  रोपवाटिका धारकास बियाणे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.  या योजनेचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फुलउत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती ,नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

अर्ज कुठे करावा?

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा. 

Leave a Reply