
E-Peak Survey : राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी “ई-पीक पाहणी” अॅप वापरण्यात येत आहे. यंदा या अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना वेळ आणि अचूकतेचा फायदा मिळणार आहे.
✅ फोटो घेण्याची अचूकता वाढली पूर्वी पिकाचा फोटो प्रत्यक्ष लागवडीपासून ५० मीटरच्या आत घेतल्यासच तो स्वीकारला जात होता. आता ही मर्यादा २० मीटरवर आणली गेली आहे, त्यामुळे पीक नोंदणी अधिक अचूक होणार आहे.
✅ ओटीपी प्रक्रिया सुलभ पूर्वी नोंदणी करताना वारंवार ओटीपी टाकावा लागत होता. आता एकदाच ओटीपी टाकून नोंदणी पूर्ण करता येते, त्यामुळे वेळेची बचत होते.
✅ ऑफलाइन नोंदणीची सुविधा शेतकऱ्यांकडे इंटरनेट नसले तरी नोंदणी करता येणार आहे. माहिती अपलोड करण्यासाठी ४८ तासांची मुभा देण्यात आली आहे.
✅ विभागनिहाय नोंदणी आकडेवारी राज्यात आतापर्यंत ९ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी ९ लाख हेक्टर क्षेत्रावर पीक नोंद केली आहे. यामध्ये संभाजीनगर विभाग आघाडीवर आहे, तर अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागातही मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.
✅ पीक विम्यासाठी बंधनकारक नोंदणी कृषी विभागाने १ जूनपासून पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक केली आहे, त्यामुळे अॅपचा वापर अधिक व्यापक झाला आहे.