भारतामध्ये पहिल्यादांच निळ्या रंगाच्या केळीचा यशस्वी प्रयोग,या केळीचे काय आहे वेगळेपण जाणून घ्या सविस्तर ..

अलिकच्या काळामध्ये अनेक तरुण शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारचे आधुनिक प्रयोग करत असतात . आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आपल्या शेतामध्ये एका उच्चशिक्षीत तरुणाने एक वेगळा प्रयोग केला आहे. भारतात प्रथमच ‘ब्लू जावा’ केळीचा यशस्वी प्रयोग या तरुणाने केलाय. या तरुणाने या निळ्या रंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण केळीचा यशस्वी प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये उजनी धरणाच्या काठावर केला आहे.

करमाळा तालुक्या मध्ये वाशिंबे हे शेतकरी अभिजीत पाटील यांचे गाव आहे . यांनी आपल्या शेतात ब्लू जावा केळीचा प्रयोग केला आहे . परदेशातील ब्लू जावा हे वाण आहे. आपल्या दोन एकर शेतात अभिजीत पाटील यांनी ब्लू जावा केळीची यशस्वी लागवड केली आहे. या केळीला ग्राहकाकडून मोठी मागणी असते . त्यामुळे अभिजीत पाटील यांनी या केळीपासून मोठे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे .

दोन एकरात केळीचे 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न

अभिजीत पाटील यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये ब्लू जावा केळीची लागवड मे 2023 मध्ये केली होती. 2600 केळीच्या रोपांची लागवड त्यांनी केली होती . आता ही केळीची झाडे 12 ते 13 फुटापर्यंत उंच झाली आहे. त्यांच्या केळीच्या बागेची काढणी पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली आहे. या बागेसाठी त्यांना अडीच लाख रुपयांचा खर्च आला असून .औषधे, खते, बाकीची मशागत करण्यासाठी हा खर्च केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तसेच दोन एकर केळीच्या बागेतून 35 ते 40 टन माल या अपेक्षीत आहे.त्यामुळे अभिजीत पाटील यांनी सांगितले की या शेतातून साधारणत: 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल .

‘आइसक्रीम केळी’ म्हणूनही ब्लू जावा केळीला ओळखले जाते ..

‘आइसक्रीम केळी’ म्हणूनही ब्लू जावा केळीला ओळखले जाते. तिचा रंग निळसर आहे हे या केळीचे वैशिष्ट्य आहे , या केळीला एक वेगळीच चव आहे. ती व्हॅनिला आईस्क्रीमसारखी आहे. ही केळी मलईदार आहे. या केळीला “ब्लू जावा” असेही म्हणतात. हि केळी मध्यम आकाराची असते . ही केळी नैसर्गिकरित्या गोड असते . ब्लू जावा केळी ही आरोग्यसाठीही फायदेशीर आहे . यामध्ये विविध प्रकारची खनिजे , जीवनसत्त्वे असतात असे अभिजीत पाटील यांनी माहिती दिली .

ब्लू जावा केळीचे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते ?

ब्लू जावा केळी ही प्रामुख्याने परदेशात पिकवली जाते. या केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन अमेरिका, व्हिएतनाम, फिलीपाइन्स या देशामध्ये घेतले जाते .अभिजीत पाटील यांना ही रोपे कोल्हापुरातील डी वाय पाटील नर्सरीने परदेशातून उपलब्ध करुन दिली होती.भारतात पहिल्यादांच या निळ्या रंगाच्या केळीचा प्रयोग केला आहे.या केळीचा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होतो की, नाही असे अनेक शेतकऱ्यांना वाटत होते परंतु आपल्या देशातील वातावरण या केळीला मानवले असे अभिजीत पाटील म्हणाले.

युवा शेतकरी अभिजीत पाटील यांनी इंजिनीयरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. अभिजीत पाटील यांनी एवढं शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न धावता ते उत्कृष्ट प्रकारची शेती करत आहेत . . केळीच्या शेतातून अभिजित पाटील यांनी या अगोदर देखील चांगला नफा मिळवला आहे. परंतु यावेळेस त्यांनी परदेशी केळीची लागवड करून एक वेगळा प्रयोग केला आहे . या प्रयोगामुळे अभिजीत पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *