केंद्रीय खत मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.मागील वर्षी खत अनुदानाच्या खर्चाने मोठा टप्पा गाठला होता . यावर्षी देखील सरकार दोन लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च खत अनुदानासाठी करणार आहे. सध्याला खरीप हंगाम सुरू होणार असून शेतकऱ्यांनी खत खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या हंगामात खतावर अनुदान जाहीर गरजेचे असते.
खत अनुदानावरील यंदाही सरकारचा खर्च जास्तच राहणार आहे.कोरोनाच्या काळानंतर खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या तसेच कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली होती.
शेतकऱ्यांना दरवर्षी सरकार कमी दरात खत मिळावे यासाठी अनुदान देत असते. कंपन्यांनी जेव्हा खताचे भाव वाढवले तेव्हा सरकारनेही अनुदानात वाढ केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना खताच्या दरवाढीचा फटका बसला नाही मात्र सरकारला खतावरील अनुदान चा खर्च वाढला.
यावर्षी अनुदानाचा खर्च कमी झाल्यामुळे असे स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झालेले आहेत या दरम्यानच्या कालावधीत खतांचे भाव कमी झाल्यामुळे सरकार डीएपी एमओपी युरिया एनपीके च्या किमती वाढवणार नाही, असे मांडवी या यांनी सांगितले सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा एक प्रयत्न आहे.