यंदा राज्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्क्यांची घट, काय असेल कारण जाणून घ्या सविस्तर…

यंदा राज्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्क्यांची घट होण्याची चिन्हे आहेत.कारण मागील वर्षी कापसाच्या दराच्या अतिनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षी लागवडीखालील क्षेत्र ४१.२९ हेक्टरवरून ४०.२० लाख हेक्टरवर आले आहे , कृषी विभागाच्या माहितीनुसार या वर्षी शेतकरी मका पिकाकडे वळण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने निविष्ठांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ,आता शेतकऱ्यांना व्हॉट्‍सॲप आणि टोल फ्री नंबरवरून तक्रार नोंदवता येणार आहे.

मागील वर्षी पूर्वमोसमी पाऊस, कमी उत्पादकता ,दरातील चढ-उतार,यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. यामुळे कापूस लागवड यावर्षी कमी होणार आहे.
यावर्षीच्या हंगामासाठी १ कोटी ७१ लाख पाकिटे बियाण्यांची आवश्यकता आहे , पुरेशी बियाणे उपलब्ध असल्याचा दावाही केला जात आहे .

पूर्वमोसमी पाऊस हा मागील हंगामामध्ये कापूस वेचणीच्या वेळी नेमका पडला त्यामुळे कापसावर त्याचा विपरीत परिणाम झाला. बीजी ३ तंत्रज्ञानास मान्यता मिळेल त्यामुळे बीज २ बियाणे उत्पादन कार्यक्रम कमी क्षेत्रावर घेण्यात आला, बियाण्यांची त्यामुळेही काही ठिकाणी कमतरता भासत आहे.

यावर्षी च्या हंगामामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे सोयाबीनचा ५०.८६ लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. त्यासाठी १३ लाख ३५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यता आहे.सध्या राज्यामध्ये १८. ४६ लाख क्विंटल बियाणे आहेत . महाबीजमार्फत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेत कडधान्य पिकांचे २४ हजार, भात पिकाचे १० हजार क्विंटल तेलबियांचे ७६ हजार क्विंटल, बियाणे प्रात्यक्षित व प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे.भात पिकाखाली १५.३० लाख हेक्टर क्षेत्राकरिता २.२० लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे तसेच भाताचे २.५५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत.

सोयाबीनच्या बियाण्यांची स्थिती

लागवडीखालील क्षेत्र : ५०.८६ लाख हेक्टर
महाबीजकडे उपलब्ध बियाणे : ३.९ लाख क्विंटल
प्रतिहेक्टर ७५ किलोप्रमाणे गरज ः ३८.१४ लाख क्विंटल
खासगी : १४.९३ लाख क्विंटल
राष्ट्रीय बीज निगम : ०.४४ लाख क्विंटल
घरचे सोयाबीन मोहीम : ४१ लाख क्विंटल

कापूस बियांणे खरेदीसाठी १५ दिवस आधीच परवानगी

१ जूनपासून शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री केली जाते. परंतु या वर्षी १५ मेपासून विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली.बियाणे खरेदी केल्यानंतर सीमेलागतच्या जिल्ह्यातून अनेकदा पावती मिळत नाही.शेतकऱ्यांचा एचटीबीटी बियाणांकडे ओघ असतो त्यामुळे १५ दिवस आधीच विक्री सुरू केली जाते . कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार १ जूनपासून कापूस लागवड सुरू करण्यात यावी असे सांगण्यात आले होते.

जैविक खते, बुरशीनाशकांचा वापर वाढला….

गेल्या तीन वर्षांपासून जैविक खते आणि बुरशीनाशकांचा वापर जास्त वाढत चाललेला आहे. २०२१ ज्या खरीप हंगामात रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी या जैविक खतांचा ३५ हजार ७५८ लिटर, ३७ हजार ३८७, २०२२ च्या खरिपामध्ये वापर झाला , २०२३ च्या खरीप हंगामात ७२ हजार २११ हजार लिटर वापर झाला आहे. तर बुरशीनाशक कृषी उद्योग महामंडळातून अनुक्रमे ३९५, ४५४ आणि ८५०. ८९ क्विंटल विक्री करण्यात आले आहेत. बुरशीनाशक ११०० क्विंटल तर जैविक खते ८३ हजार ४०५ लिटर, यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध करून दिले आहे.

खते, बियाण्यांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देश नुसार पुणे येथील आयुक्त कार्यालायात राज्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळावीत यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सॲप क्रमांक या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दिला असून, १८००२३३४००० हा टोल फ्री नंबर देखील दिला आहे .

शेतकरी या दोन्ही नंबरवर तक्रार करू शकतात . या नंबर वरती किंमत, साठेबाजी,निविष्ठांची गुणवत्ता, लिंकिंग याबाबत तक्रार करू शकता . शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत संपर्क करावा, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *