यावर्षी शेतकऱ्यांचे कापूस करेल सोने ? ही आंतरराष्ट्रीय कापसाची स्थिती ठरेल कारणीभूत, वाचा ए टू झेड माहिती…

यावर्षी शेतकऱ्यांचे कापूस करेल सोने ही आंतरराष्ट्रीय कापसाची स्थिती ठरेल कारणीभूत, वाचा ए टू झेड माहिती

मागच्या हंगाम कापूस उत्पादकांसाठी खूप नुकसानदायक ठरला असे आपल्याला म्हणावे लागेल.  त्याच्या मागील वर्षी कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गेला होता.  मागील हंगामामध्ये देखील कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल चा दर मिळेल अशी  अपेक्षा होती.  कापुस बाजार भावची स्थिती उत्तम राहील अशी काहीशी जागतिक स्तरावर परिस्थिती असल्यामुळे यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापूस उत्पादनाची स्थिती काय राहील.

सहा टक्क्यांनी कापूस उत्पादक हे कमी राहील असे अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले आहे . कारण कापूस उत्पादनाच्या महत्त्वाच्या असलेल्या चीन अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये कापूस पिकाला फटका बसलेला आहे . कापूस उत्पादनामध्ये या देशाचा 70 टक्के वाटा आहे . तसेच कापूस उत्पादनामध्ये चीन हा देश आघाडीवर असून चीनला स्वतःला जास्त कापूस लागत असतो.  चीनचे कापूस उत्पादन 12 टक्क्यांनी व भारताचे उत्पादन दोन टक्के कमी होणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त झालेली आहे.

भारतातील कापूस वापर हा चार टक्क्यांनी वाढणार आहे.  यासोबतच ब्राझील, अमेरिका मध्ये कापसाची ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.  म्हणजेच जगाला 70% कापूस पुरवठा करणाऱ्या या देशांमध्ये कापसाचे उत्पादन कमी राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या ठिकाणचे कापूस उत्पादन कमी राहण्यामागे कमी पाऊस हे कारण आहे.

अमेरिकेमध्ये देखील पावसाने दंडी मारल्यामुळे त्यामुळे कापूस उत्पादनावर त्यांचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे जागतिक कापूस उत्पादकांचा एकंदरीत अंदाज आणि कापसाची स्थिती पाहून यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कापसाचे भाव चांगले राहतील म्हणजे अशी राहिली परिस्थिती..

कापसाचे भाव चांगले राहतील . म्हणजेच वाढतच राहतील असे नव्हे कापसाच्या बाजार भावावर अनेक घटकांचा चांगला वाईट परिणाम होत असतो.  त्यामुळेच बाजारभाव मध्ये चढ-उतार दिसून येतो.  बरेच शेतकरी भाव वाढतील यामुळे कापूस विकत नाहीत.  परंतु काही कारणास्तव जो भाव आहे त्यापेक्षा देखील खाली भाव घसरतात नंतर पश्चाताप होतो.  याकरता शेतकऱ्यांना एका क्विंटल साठी किती खर्च आला याचे गणित काढून जर त्यानुसार विक्रीचे नियोजन केले तर नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

कारण जर आपण एका क्विंटलचा खर्च काढला तर आपल्याला नेमका अंदाज येतो की,  आपल्याला किती भावात कापूस विकणे परवडेल,  त्यामुळे आपल्याला अपेक्षित भाव आला तर त्या टप्प्यामध्ये कापसाचे विकण्याचे नियोजन केल्यास फायद्याचे ठरू शकते.  कारण सगळ्याच माल चांगल्या भावासाठी समजून ठेवणे हे योग्य नाही.  जर कालांतराने भावामध्ये घसरण झाली तर संपूर्ण मालाची नुकसान होत नाही . त्यामुळे कापूस टप्पा करून विकणे खूप महत्त्वाचे ठरते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *