
फेब्रुवारी महिन्यातच उजनीधरण झपाट्याने तळ गाठत आहे, त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत आहे.धरणातून कालव्यातून सोडलेले पाणी उद्या (शनिवारी) बंद केले जाणार असून मायनस १५ टक्क्यानंतर कॅनॉलमधून पाणी सोडणे आपोआप बंद होते. त्यामुळे धरणातील पाणी केवळ तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.
उजनी धरणातुन जानेवारीमध्ये कालव्यात सोडले पाणी आता १७ फेब्रुवारीला बंद होणार आहे . आवर्जून आष्टी तलावात पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे सध्या हा तलाव ५२ टक्क्यांपर्यंत भरला आहे. ५१ गावे या तलावावर अवलंबून आहे ,आता तलावात पाणी सोडले आहे त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत त्या गावांची काळजी मिटली आहे. मायनस १५ टक्के धरण झाल्यावर कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन पाणी सोडता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शेतीला पाणी सोडले हे जरा कठीण आहे .
उन्हाळ्यामध्ये १३ टीएमसी पाणी धरणातून बाष्पीभवनातून जाते. त्यामुळे एकूण १८ टीएमसीपर्यंत गाळ आणि ५६ टीएमसी मृतसाठ्यात ,बाष्पीभवनातून जाणारे पाणी, यातून केवळ २८ टीएमसीच पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, कर्जत, जामखेड, बारामती सह संपूर्ण उन्हाळया मध्ये सर्व पाणीपुरवठा योजनाना पाणी पुरवठा करावा लागणार आहे. बॉक वॉटरवरील पाणी उपसा देखील बंद केला जाईल अशी शक्यता आहे.
४० टीएमसी पाणी चार महिन्यांत संपले..
उजनीतील पाणीसाठा १७ ऑक्टोबर २०२३ रोजी ३२.३५ टीएमसी (मृत साठ्यासह एकूण ९६ टीएमसी) इतका होता. पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे धरणात केवळ ६३ टक्केच पाणी होते. परंतु , पावसाळा संपल्यानंतर नियमितरित्या धरणात पाणी सोडण्यात आले. आता धरणामध्ये ५६ टीएमसी मृतसाठा असून त्यातमध्येही १८ टक्क्यांपर्यंत आणि बाष्पीभवनाचे पाणी वगळून उर्वरित पाणीसाठा पावसाळा येईपर्यंत पुरवावे लागणार आहे.
सोलापूर शहरासाठी नदीतून दोन आवर्तने..
प्रत्येक ५५ ते ६० दिवसांनी उजनी धरणामधून सोलापूर शहराला पाणी सोडावे लागते. भीमा नदीतून औज बंधाऱ्यापर्यंत अंतर पार करण्यासाठी १० दिवस लागतात. . त्यामुळे प्रत्येकवेळी सहा ते सात टीएमसी पाणी, औज बंधाऱ्यात सोडावे लागते. आता उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून मार्च व मे महिन्यात दोनवेळेस पाणी सोडण्यात येणार आहे.
धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन
उद्या (शनिवारी) उजनी धरणातील कॅनॉलमधून सोडलेले पाणी बंद होईल.यापुढे पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच वापरले जाणार आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवणार नाही,यादृष्टीने धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केले आहे .
– धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर