हि सकसेस स्टोरी आहे ‘रोजा’ नावाच्या मुलीची जी एकाच वेळी काम आणि शेती करत असे, पण आता ती फक्त शेती करते आणि त्यातून भरपूर पैसे कमावते. लोक तिच्यासाठी खूप आनंदी आहेत आणि त्यांना वाटते की ती खूप चांगले काम करत आहे.
साधारण गावखेड्यात असा विचार असतो की उच्च शिक्षण घेऊन मोठ्या कंपनीत नोकरी मिळवावी . परंतु , रोजा रेड्डी यांच्या बाबतीत हे खोटं ठरलं . त्यांनी मात्र शेतीला जवळ करून नोकरी सोडून दिली . त्यांनी शेतीसाठी कुटुंबीयांशी वाद घातला ,त्यांचे स्वप्नच होते की आपण शेतकरी व्हावं.
त्यांच्या भावाने व वडिलांनी शेतीसोडून दुसरा व्यवसाय करायचा असे ठरवले होते . रोजाने शेती करणे सोडले नाही आणि आता ती त्यातून भरपूर पैसे कमावते! तिने शेतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिची नोकरी सोडली. रोजा यांनी दाखवून दिले की, जर तुम्ही योग्य पद्धतीने शेती केली तर हा खरोखरच यशस्वी व्यवसाय होऊ शकतो.
रोजा ह्या कर्नाटकामधील डोन्नेहल्ली गावातील रहिवाशी आहेत . घरच्यांची इच्छा होती की रोजाने शहरात नोकरी करावी, परंतु कोरोना काळात वर्क फ्राम होम रोजाला मिळाले व तिने या संधीचा फायदा घेतला.
रोजाचे भाऊ आणि वडिलांना शेतीतून नुकसान होत असल्याने ते शेती सोडण्याच्या तयारीत होते. अशा परिस्थितीत मात्र रोजाने शेती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी पुंर्ण पणे सेंद्रीय पद्धतीचा उपयोग केला. नोकरीचं काम झाल्यावर त्या रोज ४ तास शेतीत काम करू लागल्या.
रोजा ने प्रथम नुकसान का होते याचे कारण शोधले हे सर्व औषधांचा ,रासायनिक खताचा खूप प्रमाणात वापर केल्यामुळे होते . सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे रोजाने ठरवले त्यासाठी त्या कुटुंबीयांच्या विरोधात देखील गेल्या .कुटुंबीय म्हणत होते की, रोजाने नोकरी करावी
कुटुंबीयांना नव्हता विश्वास
सेंद्रीय शेतीतून उत्पादन वाढवता येऊ शकते असा विश्वास कुटुंबीयांना नव्हता . तिला सर्व हसत होते परंतु त्यांचा विचार न करता पूर्णवेळ शेतीसाठी दिला
रोजा आता तिच्या शेतामध्ये चाळीस प्रकारचे भाजीपाला उत्पन्न काढते , बटाटे,भेंडी, टमाटर, वांगे, शिमला , मिरची इ . समावेश आहे . हेच नाही तर तिने तिच्या शेतीमध्ये सेंद्रीय शेती चा समावेश केलाच तसेच लोकांच्या मनात सेंद्रीय शेतीबद्दल जागरुकता निर्माण केली .
५०० ते ७०० किलो भाजीपाल्याचे उत्पादन
रोजा अधिक लोकांना भेटली आणि वेगवेगळ्या ठिकाणी अधिक आपलं नेटवर्क वाढवलं. त्यानंतर, तिने निसर्ग फार्म्स नावाचा व्यवसाय सुरू केला आणि परिसरातील 500 शेतकऱ्यांसोबत काम केले. दररोज ते 500 ते 700 किलो भाज्या पिकवतात. रोजा या व्यवसायातून भरपूर पैसे कमावते त्यातून त्यांनी 25 जणांना नोकरी दिली आहे.