![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/राज्यात-शासकीय-कापूस-खरेदीचा-मुहूर्त-कधी-निघणार-सीसीआयकडून-मोठी-अपडेट.webp)
यंदाचा झालेल्या अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरीपातील कोरडवाहू चा कापूस आला नाही . जो आला आहे तो बागायती क्षेत्रातील आहे . त्यात मॉइश्चरायझर (ओल) आहे.कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे पर्यंत व्यापारी दर आहे. तरीही हवा तसा कापूस विक्रीस येत नाही. व्यापाऱ्यांकडून सात हजाराच्या आत दर दिला गेल्यास सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) कापूस खरेदी केंद्र सुरू करणार आहे. जिल्ह्यात अकरा केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती यांनी दिली आहे.
‘अलनिनो’प्रभावामुळे यंदा पाऊस लांबला. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस सुरू झाला. जुलैत चांगला पाऊस झाला तरी ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील कापसासह इतर पिकांची वाढ खुंटली आहे . सप्टेंबर मध्ये बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे 88 टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसाच्या ओढीने अद्याप कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला बोंडे फुटलेले नाही.
उडीद, मूग ही पिके वाया गेली. बागायती क्षेत्रातील कापसाचे उत्पादन बाजारात आले आहे. शेतकऱ्यांची या कापसाला अधिक चांगल्या दराची अपेक्षा आहे . त्यामुळे कापूस बाजारात येत नसल्याचे चित्र दिसत आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावरून अद्याप कापसाला मागणी सुरू नाही, दरही कमी आहेत . त्यामुळे स्थानिक कापसाला व्यापाऱ्यांकडून मागणी नाही. मुळातच कापसाला चांगला भाव मिळाल्यास अधिकचा कापूस बाजारात येण्यास सुरुवात होईल त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सीसीआयने ठरवले तरी दिवाळीनंतर सरकारी कापूस खरेदीचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे.
दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी..
दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारी कापूस खरेदी सुरू होत असते. यंदा दिवाळीनंतर सरकारी कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा प्रश्न अद्याप अध्यातरीत असून सीसीआय सहा केंद्रावर खरेदी करणार आहेत . सीसीआयचा सब एजंट म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते . पणन महासंघाकडून राज्यात 50 केंद्रावर कापूस खरेदी होत असते . नागपूर, जळगाव, यवतमाळ, वनी, अकोला, अमरावती, खामगाव, परभणी, नांदेड ,परळी, व छत्रपती संभाजीनगर या 11 झोनमध्ये दोन टप्प्यांमध्ये कापूस खरेदीची सुरुवात पणन करते . यंदा महासंघाचे प्रयत्न सुरू असले तरी सरकार काय निर्णय घेणार यावर पणन केंद्राचे भविष्य अवलंबून आहे. आणखीन सरकारने कापूस विकत घेण्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही.
बाजारात कापसाला व्यापारी भविष्यात देणारा संभाव्य दर पाहता शेतकरी कापूस व्यापाऱ्यांना विकतील असे चित्र दिसत नाही. त्यामुळे सीसीआय ने कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा दिलासा मिळेल. व्यापाऱ्यांवर कापूस दराबाबत नियंत्रण असेल बाजारात कापसाला 7000 पेक्षा दर कमी मिळत असल्यास सीसीआय कापूस खरेदी सुरू करेल. जिल्ह्यात रावेर, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, पहूर, शेंदुर्णी ,जळगाव, आव्हाणे, चोपडा, बोदवड ,भुसावळ, या ठिकाणी केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव आहेत. (अमरनाथ रेटी विभागीय व्यवस्थापक सीसीआय)