Maval : कॉर्पोरेट नोकरी सोडली, तरुणाची सेंद्रिय पद्धतीने शेती, लाखो रुपयांचा नफा, पीक काढण्यापूर्वी बुकींग…
मावळ पुणे जिल्ह्यातील (Pune) अनेक तरुण चांगली शेती करण्यासाठी प्रसिध्द आहेत. काही शेतकऱ्यांनी (Young Farmer) तर रेकॉर्ड केले आहेत. त्याचबरोबर आधुनिक यंत्राचा वापर करुन कमी मेहनतीमध्ये चांगली शेती करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील (Pune Maval)एका तरुणाने कॉर्पोरेट नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय पद्धतीने बटाट्याची लागवड त्यातून त्या तरुण शेतकऱ्याने लाखो रुपयाचे उत्पन्न काढले आहे. विशेष म्हणजे बटाटे काढण्यापुर्वी लोकांनी बुकींग केले आहे.
उच्चशिक्षित तरुणाने कॉर्पोरेट नोकरीच्या मागे न लागता घरची शेती करून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने 2 एकर जागेत सेंद्रिय पद्धतीने बटाट्याची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने बटाट्याची लागवड केल्याने बटाट्याची चव, रंग चांगला येत असल्याने, चाकण, पिंपरी, आणि पुण्यातील मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांनी बटाटा काढण्यापूर्वी बटाट्याचे बुकिंग केले आहे. त्यामुळे या उच्च शिक्षित तरुणाला लाखो रुपयांचा नफा झाला आहे
Source:- tv9marathi