भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची भुईमूग पिकाच्या वाढीस गरज असते व हे समशीतोष्ण हवामान भुईमूग पिकाला उन्हाळ्यात प्राप्त होते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्यामुळेच हे पीक उन्हाळी हंगामात घेतले जात असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमुगाच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 24 ते 27 डिग्री से. ग्रे. तापमानाची गरज असते व तापमान 20 डिग्री से. ग्रे. पेक्षा कमी झाल्यास शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते.
सध्या भुईमूग पीक फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा. सध्या भुईमूग पिकामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
आकारने १ ते २ मिमी तर काळपट तपकिरी रंग.
पिल्ले व प्रौढ अवस्था जास्त नुकसानकारक.
पानाच्या खालच्या बाजूने रसशोषण करते. रसशोषण करताना शरीरातून गोड चिकट द्रव टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येते.
आर्थिक नुकसान पातळी : प्रति रोप ५ ते १० मावा.
नागअळी (पाने पोखरणारी अळी) :
लहान अळ्या पानांतील हरितद्रव्य खातात. त्यामुळे पानांवर वेड्यावाकड्या रेषा दिसून येतात. मोठी अळी पानांची गुंडाळी करून आतील भाग खाते.
जास्त प्रादुर्भावामध्ये पीक एकसारखे करपलेले दिसते.
आर्थिक नुकसान पातळी : ५ प्रादुर्भावग्रस्त पाने प्रति झाड. (लागवडीनंतर ३० दिवसांनी)
फुलकिडे :
कोवळ्या शेंड्यावर व पानांवर आढळतात.
पिल्ले व प्रौढ अवस्था अति नुकसानकारक.
पानांतील रस शोषून घेताना जखमा करते. त्यामुळे तो भाग पांढुरका होऊन नंतर तपकिरी दिसतो.
नागअळीच्या सर्वेक्षणाकरिता एकरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत.
नत्रयुक्त खतांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
रोगग्रस्त झाडे नष्ट करावीत.
एकरी १० ते १२ पिवळे व निळे चिकट सापळे लावावे.
नागअळीच्या नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी, प्रौढ ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० प्रति हेक्टर किंवा प्रौढ टेलेनोमस रेमस ५०,००० प्रति हेक्टरी २ वेळा ७ ते १० दिवसांच्या अंतराने सोडावेत.
source:- krishijagran