पशुसंवर्धन विभागातील शासनाच्या  विविध  योजना, आसा करा अर्ज!

L

पशुसंवर्धन पशुसंवर्धन खात्यांतर्गत नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजना अंतर्गत 11 जानेवारीपर्यंत अर्ज एएच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या संकेस्थळावर किंवा गुगल प्ले मोबाईल ॲपवर स्वीकारण्यात येणार आहेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क करायचा आहे ,

 
नावीन्यपूर्ण आणि जिल्हास्तरी योजना दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 23+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2022- 23 या वर्षात
 राबविली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी 11 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

 

लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा

योजनाच्या अंतर्गत तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि येणाऱ्या काळात स्वतःचा व्यवसाय करून ग्रामीण भागातील तरुणांनी आपली आर्थिक व्यवस्था मजबूत करावी. या हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे तरी लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. जे. पराडे यांनी केले आहे.

योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

– https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

– अँड्रॉइड मोबाईल वरून AH-MAHABMS हे APPLICATION डाऊनलोड करून अर्ज भरू शकता.

– अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 यांच्याशी संपर्क साधू शकता.

 

 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *