सध्या सोसायट्यांमार्फत
शेतकर्यांना विविध पिकांसाठीच्या अल्पमुदत पीककर्जवाटपाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी लागवडीसाठीच्या हेक्टरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांना बियाणे, खते, औषधे आदी निविष्ठांच्या खरेदीसाठी या वाढीचा उपयोग होणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष 2023-24 हंगामाकरिता सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ऊस, द्राक्षे, केळी, ड्रॅगनफ्रूट, डाळिंब, अंजीर आदी फळांसह भुईमूग, कांदा, टोमॅटो, भात, बटाटा, रेशीम लागवडीसाठीच्या हेक्टरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
तसेच अंजीर फळासाठी प्रतिहेक्टरी पीक कर्ज मर्यादा 42 हजार रुपयांवरून थेट 1 लाख 25 हजार रुपये करण्यात आली आहे. कोरोना काळात अंजिरास वाढलेली मागणी, शेतकर्यांकडून वाढविले जात असलेले क्षेत्र आणि प्रक्रिया उद्योगातून अंजिराची वाढत असलेली उलाढाल ही शेतकर्यांनी बैठकीत मांडली.
आडसाली ऊस 1 लाख 60 हजार (20 हजार), पूर्व हंगामी 1 लाख 50 हजार (19 हजार), सुरू हंगाम 1 लाख 50 हजार (19 हजार), खोडवा 1 लाख 25 हजार (15 हजार). द्राक्षे 3 लाख 50 हजार (20 ते 25 हजार). केळी, 1 लाख 35 हजार (35 हजार) टिश्युकल्चर 1 लाख 65 हजार (25 हजार), पेरू 1 लाख रुपये (14 हजार).
अंजीर 1 लाख 25 हजार (83 हजार), डाळिंब 1 लाख 75 हजार (25 हजार), ड्रॅगनफ-ुट 1 लाख 40 हजार.भुईमूग, जिरायत 45 हजार (5 हजार), बागायत 50 हजार (6 हजार). कांदा 1 लाख रुपये (20 हजार), टोमॅटो 1 लाख रुपये (20 हजार), कंसात वाढ नमूद करण्यात आली आहे.
source:-krishijagran