मोठी बातमी! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार निम्म्या किमतीत वीज, देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या प्रमाणात गरज भासते ती पाण्याची. पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. त्याचबरोबर शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी विजेची ही गरज भासते. त्याचबरोबर विजेशिवाय (Maharashtra Assembly) विहिरीतील किंवा शेततळे यामधील पाणी पिकाला देणे शक्य नाही. परंतु वीज बिलामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमधून फासे उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेचाही आर्थिक (Maharashtra Assembly) बोजा सहन होत नाही. म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना विजेसंदर्भात एक मोलाची ग्वाही दिली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार निम्म्या किमतीत वीज
विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विजेबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना विजेबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. विजेचा आर्थिक खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आगामी तीन वर्षांत राज्यातील 30 टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार आहे. याचमुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वीज दरापेक्षा निम्म्या किमतीत वीज मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही आवश्यक तेवढी मुबलक प्रमाणात वीज मिळेल,” अशी ग्वाही त्यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली आहे.

 

कांद्याबाबत म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याचा प्रश्नही मांडला. नाफेड करून कांदा खरेदी सुरू झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी ते म्हणाले की, “निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 16 टक्के निर्यात जास्त झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 16 टक्के निर्यात जास्त झाली आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून आतापर्यंत 45 हजार 796 टन कांदा सरासरी 942 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही.”

source-mieshetkari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *