Ration Card | सर्व सामान्य वर्गातील लोकांसाठी रेशन कार्ड ही किती महत्वाची गोष्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. रेशन कार्ड (Ration Card) आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्यासह त्याचा सर्वात महत्वाचा उपयोग हा कमी मूल्यात धान्य (Ration Card) विकत घेण्यासाठी आहे. सरकारने गरजू लोकांसाठी हा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्याचा या गरजू लोकांना फायदा होईल. तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला एक नवीन सुविधा मिळणार आहे. चला तर मग ही सुविधा काय हे जाणून घेऊया.
योजनांसाठी माराव्या लागतात खेट्या
नागरिकांना इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी सातत्याने आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये खेट्या माराव्या लागतात. कितीही खेटा मारून देखील त्यांची कामे वेळेत होत नाहीत. तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना असलेली कामे तसेच काही कागदपत्रांची अपूर्तता यामुळे नागरिकांची कामे अपुरी राहतात. म्हणूनच नागरिकांना तहसील कार्यालयात खेट्या माराव्या लागतात. परंतु यावर आता चांगलाच उपाय मिळाला आहे. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
ऑनलाईन सुविधा उपलब्ध
अताचे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर कोणतीही माहिती उपलब्ध होत आहे. याचप्रमाणे आता डिजिटल रेशन कार्ड देखील उपलब्ध झाले आहे. नागरिक सहजरित्या इतर योजनांच्या लाभासाठी रेशन कार्डाचा ऑनलाईन पद्धतीने वापर करू शकतात. ही सुविधा सामान्य नागरिकांसाठी प्रचंड फायद्याची आहे.
आता मोजावे लागणार पैसे
नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा सुरू झाली आहे. परंतु यासाठी नागरिकांना आता रेशन कार्ड ऑनलाइन सुविधेसाठी काही शुल्क मोजावे लागणार आहे. रेशन कार्डसाठी ऑनलाइन सुविधा सुरू केल्यामुळे हा शासनाचा निर्णय अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्या सुविधा उपलब्ध?
- शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीत नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे.
- नावात दुरुस्ती.
- पत्ता बदल व नाव वाढविणे व कमी करणे.
- शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता क्यूआर कोड
- ई-शिधापत्रिका ऑनलाईन तसेच, डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
किती मोजावे लागेल शुल्क
- रेशनकार्ड प्रकार ऑनलाईन शुल्क (रूपये)
- अंत्योदय अन्न योजना 25
- प्राधान्य कुटुंब योजना 50
- एपीएल शेतकरी 50
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी व्यतिरिक्त 50
- एपीएल शेतकरी 100
Source:- mieshetkari