रोपवाटिका व शेती व्यवसायात मिळविले थक्क करणारे यश : श्रीमती सरला रमेश मोहिते , रा मानोली ,ता . मंगरूळपीर ,जि वाशिम
कधीकाळी चुल आणि मुल असे मर्यादीत विश्व असलेल्या महिलांनी नजीकच्या काळात ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानासोबतच शेती पुरक व्यवसायातही आपल्या कर्तुत्वाचे अटकेपार झेंडे रोवले आहेत अशाच कर्तुत्वान महिलांचा आदर्श जानणान्या पैकी एक आहेत वाशिम जिल्ह्मातील मंगरूळपीर तालुक्याच्या सौ.सरला रमेश मोहिते , सरलाताईनी रोपवाटीका व्यवसायात घेतलेली आघाडी थक्क करणारी आहे.
अमरावती जिल्ह्मातील नांदगावं (खं) तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वाढोना रामनाथ माहेर असलेल्या सरलाताईचा जन्म सधन शेतकरी कुटुंबात झाला. वडिलोपार्जीत ६० एकर शेतीच्या देखरेखीची जबाबदारी सरलाताई सांभाळत, मजुराकरवी शेतीतील विविध कामे त्या करूण घेत, माहेरी पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या सरलाताईंनी शेतीमातीशी जुळलेली नाळ तुटु नये याकरीता लग्नानंतर किमान कौशल्यावर आधारीत उद्यानविद्या अभ्यासक्रम पुर्ण केला, त्यांचे पती श्री. रमेश तुळशिराम मोहिते मंगरुळपीर तालुक्यातीत मानोली येथे भगवंतराव महाकाळ कनिष्ठ महाविद्यालयावर शिक्षक आहेत, सरलाताईची कृषि क्षेत्रातील आवड लक्षात घेता त्यांनी प्रथम घरालगतच्या खुल्या जागेतच फळरोपवाटीका व भाजीपाला रोपवाटीका स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
सुरवातीला पपईची २५ हजार रोप असलेल्या या रोपवाटीकेच्या व्यवस्थापनासह रोप विक्रीची संपूर्ण जबाबदारी सरलाताईच्या खांद्यावर सोपवीण्यात आली, सरलाताईने हे आवाहान पेलत यशस्वी महिला रोपवाटिका उद्योजीका होण्याचा मान मिळवीत इतर महिलासमोर आदर्श निर्माण केला, सरलाताई व्यवसायिक सचोटी मुळे जेमतेम २५ हजार रोप असलेल्या या रोपवाटीकेत आज पपई रोपे व भाजीपाला रोपाची मोठया प्रमाणात दर्जेदार रोप निमीती करून विक्री करतात रोपवाटीकेच्या इवल्याशा रोपवाटिकेचा सरलाताईने वटवृक्षच केल्याची प्रचीती येते. महीला उद्योजीका म्हणुन नावलोकीक मिळवीणाऱ्या सौ. सरला मोहीते यांची दिनचर्या कुटुंब व रोपवाटिके सोबतच चालतें . त्याचबरोबर जांब येथील ५ एकर ओलीताचे क्षेत्र सुद्धा त्या सांभाळतात या क्षेत्रामध्ये विविध पिके सोयाबीन तुर, तसेच शेडनेट मधील टोमटो बिजोत्पादन कार्यक्रम राबिविला जातो तसेच रब्बी हंगाममध्ये कांद्याचा २ ते ३ एकर बिजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. हे सर्व करताना १० ते १५ महिला व ५ ते ६ पुरुषांना रोजगार मिळत आहे . मात्र हा सारा व्याप सांभाळताना त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. सकाळी नऊ वाजेपर्यत कुटुंबासाठी वेळ दिल्यानंतर त्या रोपवाटीकेत पोहोचतात व त्या नंतर महिला व पुरुष मजुरांना कामच्या सूचना दिल्यानंतर त्या देखील रोपवाटीकेच्या कामात जातीने लक्ष घालतात. पिशव्यांमध्ये माती भरण्यापासुन ट्रेमध्ये कोकोपिट भरण्यापासुन ते अंकुरलेल्या रोपाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबत पिशव्यामध्ये बियाणे टाकले नंतर त्यांच्या उगवन शक्तीचा कालखंड, खताची मात्रा, अन्नद्रव्य व्यवस्थापन या साऱ्या पुरकबाबींचा त्या माहीती ठेवतात. यावरून या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान प्रगल्भ असल्याची जान होते.
मा . शारदा महिला स्वंयसहायता या ११ महीलांचा बचत गट स्थापन करून रोपवाटीकेला सुरवात केली, आज मीतिस २० गुंठे शेडनेट हाउस, २० गुठे पॉलिहाउस हे सर्व कृषि विभागाच्या सहाय्याने जिल्हा कृषि अधिकारी श्री. तोटावार साहेब, तंत्र अधिकारी श्री. कंकाळ साहेब, तालुका कृषि अधिकारी श्री. शेळके साहेब श्री. इंगोलेसाहेब व सपूर्ण कृषि विभाग यांचे सहकार्याने उभे राहीले, आजमीतिस सरलाताईकडे एकुण ५ एकर क्षेत्रावर विहीर, बोरवेल, सोलर सयंत्र, २० गुंठे पॅालिहाउस, २० गुंठे शेडनेट हाउस या सर्वामध्ये रोपवाटीका, तर इतर क्षेत्रामध्ये वेगवेगळे पिके घेतल जातात, सन २०१९ मघ्ये या उलेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्यावतीने वंसतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करूण त्यांचा यथेाचित सन्मान केला गेला आहे.
शब्दांकन : श्री. आर. एस. इंगोले,
तालुका कृषि अधिकारी, मंगरुळपीर, जि. वाशिम
Reference and Source: शेतकरी मशिक , कृषी विभाग महाराष्ट्र शासन