राज्यातील शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत. गहू, हरभरा यांसारखी रब्बी हंगामातील पिके परिपक्व होऊन अगदी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आले आहेत. पण अशातच आता हवामान (Today Weather Forecast) विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान (Today Weather Forecast) विभागाच्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस कोठे पाऊस पडू शकतो हे जाणून घेऊयात.
पुढचे चार दिवस पडणार पाऊस
भारतीय हवामान विभाकडून राज्यात पुढचे 4 दिवस पाऊस (Today Weather Forecast) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 15 मार्च ते 18 मार्च पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस वाऱ्यासह धुमाकूळ घालणार आहे. यामुळे आता नागरिकांसह शेतकऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे. मागच्या पंधरा दिवसांत आता दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.
कोठे पडेल अवकाळी पाऊस?
हवामान विभागाने आज धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यामध्ये काही ठिकाणी गारपिटीसोबतच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 16 मार्चला विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याकरता ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात गारपीटीचा धोका देखील वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाला धोका
अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांची नासाडी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करून घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी आपला काढलेला शेतमाल व्यवस्थित प्लास्टिकमध्ये बंद करून पावसापासून बचाव होईल अशा ठिकाणी ठेवावा. अन्यथा शेतकऱ्याना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
source-mieshetkari