पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व क्षारपड जमिनीत तग धरणाऱ्या ऊस जातींची शिफारस ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केली आहे. कोएम ०२६५ आणि एमएस १०००१ या जातींची लागवड करावी. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या मुळांची रचना खोलवर असते. कमी रुंदी आणि उभट पानांची रचना असलेल्या जाती पाण्याचा सहन ताण करतात.
ऊस कांडीवर आणि पानांवर पांढरा मेणाचा थर असलेल्या जाती पाण्याच्या ताणास सहनशील असतात. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या पानातील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी असते. पानांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते
खोडवा ऊस
पाणी कमतरतेच्या परिस्थितीत खोडवा पीक व्यवस्थापन
पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या खोडव्यात सरी आड सरी पाचटाचे आच्छादन करावे. बगला फोडू नयेत, यामुळे पाण्याची बचत होते. जोडओळ पट्टा पद्धतीमध्ये (३ x ६ फूट) पट्ट्यात पाचटाचे आच्छादन करावे. रुंद सरी (४ ते ५ फूट) पद्धतीमध्ये सर्व सर्यांत पाचटाचे आच्छादन करावे. बुडख्यावरील पाचट बाजूला सारावे.नेहमीच्या व रुंद सरीतील लागणीच्या खोडव्यात एक आड एक सरी पाणी देण्याचे नियोजन करावे. पट्टा पद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे.
खोडवा पिकास पाण्याचा ताण असेल, त्यावेळी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅशच्या एकवीस दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात. यामुळे खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करते.
खोडवा पिकास जेव्हा पाण्याचा ताण बसतो, त्यावेळी एकरी ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅशची जादा मात्रा मुळांच्या सान्निध्यात द्यावी. यामुळे खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करते. खर्च थोडा वाढतो, पण पीक जगते.
ऊस हे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासामधील मुख्य घटक आहे परंतु दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ३ साच्या दर हेक्टरी उत्पादन क्षमतेत घट होत आहे. महाराष्ट्रामधील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पीकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या ऊसाइतकेच येऊ शकते. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त येऊ शकते.
source:-krishijagran