राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान, कृषिमंत्र्यांनी तत्काळ पंचनामे करून भरपाईचे दिले आदेश

राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाकडून चार दिवसापूर्वीच राज्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिट  होण्याचा अंदाज वर्तवला होता. याचं अंदाजानुसार राज्यामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे तात्काळ दखल घेत आहेत. अब्दुल सत्तार  यांनी याबाबत महत्वपूर्ण आदेश देखील दिले आहेत.

कोठे झाले शेतीचे नुकसान?
राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धिंगाणा काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे शेती (Agricultural Information) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पाऊस अवकाळी पावसाळी हजेरी लावली. याचं पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार गंभीरपणे दखल घेत तातडीने कामाला लागले आहेत.

कृषिमंत्र्यांनी दिले आदेश
अवकाळी पावसामुळे शेती (Agriculture Maharashtra) पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा आर्थिक फटका मिळाला आहे. याचमुळे अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत
शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांनी केली विनंती
“महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, काही शेतकरी हवालदिल झाले आहेत, सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, तुमचं जे नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामा झाल्यानंतर सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पण मी पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत. अधिकारी, जिल्हाधिकारी सर्व पंचनामे करुन आमच्याकडे माहिती पाठवतील,” अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना अशी विनंती केली आहे.
source- mieshetkari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *