हळद बियाणे मिळेल.

✳️आमच्याकडे सर्वात जास्त उत्पन्न देणारी जात कृष्णा शेलम जातींचे खात्रीशीर बुरशी विरहित हळद बियाणे योग्य भावात मिळेल.. ✳️किंमत 3500 रु 100 kg प्रमाणे. ✳️ घरपोच सेवा उपलब्ध.  

Soyabin bajarbhav : सोयाबीनला लातूरमध्ये किती बाजारभाव मिळतोय?

Soyabin bajarbhav : राज्यात १० एप्रिल रोजी सोयाबीनची एकूण १३,४४५ क्विंटल आवक झाली असून सरासरी बाजारभाव ४,१२९ रुपये होता. त्याआधी ९ एप्रिल रोजी सरासरी दर सुमारे ४,१८९ रुपये होता. केंद्र सरकारने यंदा सोयाबीनसाठी जाहीर केलेला हमीभावापेक्षा हे दर कमी आहेत. दरम्यान या कालावधीत सर्वाधिक आवक लातूर बाजारात झाली. १० एप्रिल रोजी लातूरमध्ये तब्बल १२,७१३ क्विंटल […]

Sugar factory : अडचणीतील साखर कारखान्यांसाठी आता सरकारचा हा निर्णय, जाणून घ्या…

Sugar factory : महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने नव्याने समिती गठीत केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अवसायनाच्या उंबरठ्यावर असलेल्या कारखान्यांच्या भागीदारी, सहयोगी तत्वावर किंवा भाडे तत्त्वावर चालवण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी ही समिती काम करणार आहे. राज्यात डिसेंबर २०२४ मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सहकार खात्याच्या नेतृत्वात बदल झाला. […]

‘Shetkari Bhavan’: ‘शेतकरी भवन’ योजना राज्यात वेगाने राबवली जाणार…

‘Shetkari Bhavan’: राज्यातील नांदेड, जालना, कोल्हापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्याने शेतकरी भवन उभारण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील बिलोली, जालना जिल्ह्यातील वडीगोद्री, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील बाजार समित्यांचा समावेश आहे. या शेतकरी भवनांकरिता अंदाजे खर्च पुढीलप्रमाणे आहे, बिलोली येथे 1.52 कोटी, वडीगोद्री येथे […]

Water management : शेतीचा आधार सिंचन; आता जलव्यवस्थापनावर राज्याचा भर..

water management

water management : शेतीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असून, प्रभावी सिंचन व्यवस्थेमुळे उत्पादनक्षमता आणि शाश्वत शेतीस चालना मिळते. यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यभर ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी, जलसाक्षरतेसाठी आणि पाणी बचतीविषयी जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पंधरवड्याच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाच्या […]

banana and mango gardens : उन्हाच्या झळांत केळी, आंबा बागांची अशी घ्या काळजी..

banana and mango gardens

banana and mango gardens : सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून, यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या ताज्या सल्ल्यानुसार, केळी आणि आंबा बागा सध्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत असून, योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात सुधारणा शक्य […]

Agricultural exporter : दिलासादायक अमेरिकेची उलट्या कराला स्थगिती; कृषी निर्यातदारांमध्ये उत्साह…

Agricultural exporter : मध्यंतरी अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लागू करावयाच्या ‘ उलटा कर’ (reciprocal tariff) धोरणाला ९० दिवसांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये, विशेषतः कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादकांमध्ये, पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे तांदूळ, मसाले, फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या प्रमुख कृषी उत्पादनांची अमेरिका बाजारात होणारी निर्यात सध्या तरी स्थिर […]

Dam storage : राज्यातील धरणसाठा पन्नास टक्क्यांच्याही खाली..

Dam storage : राज्यात १० एप्रिल २०२५ रोजीपर्यंत सर्व धरणांमध्ये एकूण ४८२४३.६० दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा १७३५८.७७ द.ल.घ.मी. इतका आहे. ही टक्केवारी ४२.८६ टक्के असून, गतवर्षी याच दिवशी ती ३६.३१ टक्के होती. यावरून यंदा पाणीसाठा जास्त असला तरी अनेक भागांत साठा समाधानकारक नाही. राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण साठा ४२.४२ टक्के इतका […]