कांदे बियाणे मिळतील

☘️आमच्याकडे उत्तम प्रतीचे पावसाळी कांदे बियाणे मिळेल बी तयार आहे.☘️पावसाळी लाल एलोरा चायना किंग बियाणे मिळतील .☘️खात्रीशीर व गॅरेंटेड बियाणे आहेत.☘️महाराष्ट्र राज्य कुरिअर सेवा उपलब्ध आहे
Hapus mango : कृषी क्षेत्रात राज्याची चमकदार कामगिरी; हापूस आंब्याला सुवर्णपदक…

Hapus mango : एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत. भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कार […]
Amravati Market Committee : घोटाळ्यानंतर अमरावती बाजारसमितीचे संचालक मंडळ होणार बरखास्त..

Amravati Market Committee : ज्वारी खरेदीत झालेल्या घोटाळ्यानंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला असून मागील आठवड्यापासून हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजत आहे. या पार्श्वभूमीवर आता संचालक मंडळच बरखास्त करण्यात येणार असल्याचे समजत आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ […]
Turmeric research : मराठवाड्यात हळद संशोधनाला येणार गती; निधी वितरीत

Turmeric research : मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ प्रकल्पासाठी यापूर्वी मंजूर केलेल्या 100 कोटींपैकी उर्वरित 26 कोटी रुपयांचा निधी तत्काळ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च 709 कोटी रुपये असून, त्यास वित्त विभागाची […]
Agriculture abroad : शेतकरी बांधवांनो, यंदा परदेशातील शेती पाहायचीय? मग हे वाचाच…

Agriculture abroad : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत GeM पोर्टलवर १४ जुलै, […]
Maharashtra rain alert : कोकण, मध्य महाराष्ट्रात दमदार, तर अनेक ठिकाणी पावसाची विश्रांती..

Maharashtra rain alert : भारतीय हवामान विभागाने १६ जुलै रोजी सकाळी जारी केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पावसाचा स्वरूप विभागानुसार वेगळा राहणार आहे. काही भागांमध्ये दमदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी उघडीप जाणवू शकते. कोकण व गोवामध्ये १६ ते २२ जुलैदरम्यान बहुतेक ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. दररोज बहुतांश भागांत जोरदार सरी येण्याची शक्यता असून, किनारी […]